देहू : वैकुंठगमन तथा तुकाराम बीज कार्यक्रम जाहीर | पुढारी

देहू : वैकुंठगमन तथा तुकाराम बीज कार्यक्रम जाहीर

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा

देहूतील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा अर्थात ३७४ वी तुकाराम बीज देहूत रविवारी साजरी होत आहे. देवस्थानकडून तुकाराम बीज कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

रविवारी (दि. २० ) तुकाराम महाराजांची बीज देहू येथे साजरी होत आहे. त्यानिमित्त संस्थांनी कार्यक्रम जाहीर केला आहे. वैकुंठ स्थान मंदिर, मुख्य मंदिर आणि जन्मस्थान मंदिर या ठिकाणी कीर्तन होणार आहे. सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत वैकुंठ स्थान मंदिरासमोर भजनी मंडपात वैकुंठ सोहळा कीर्तन होईल.

या यात्रेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पाच पोलिस निरीक्षक, २० उपनिरीक्षक/ सहाय्यक पोलिस निरीक्षक, २५० पोलिस कॉन्स्टेबल, एस आर पी एफ च्या दोन तुकड्या, यासोबत साध्या वेषातील पोलिस, खंडणी विरोधी पथक आदींचा ताफा असेल. मंदिरात यात्रेपूर्वी बॉम्बशोधक व नाशक पथक तपासणी करेल.

संस्थानच्या वतीने १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वैकुंठस्थान मंदिरातही सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असेल. फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या तैनात असतील. इंद्रायणीवरील पुल बंद केला जाणार आहे. कोणीही जलचरांना काही खायला घालू नये, असे स्पष्ट आदेश आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

तुकाराम बीज सोहळा-
पहाटे ३ – काकडा आरती.
पहाटे ४ – मुख्य मंदिरात श्रींची महापूजा, व शाळा मंदिरातील महापूजा- संस्थांचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते होईल.
सकाळी ६ – वैकुंठ स्थान मंदिरात तुकाराम महाराजांची पूजा- तुकाराम महाराजांचे वंशज व वारकरी यांच्या हस्ते.
सकाळी १०.३० – पालखी प्रस्थान ( वैकुंठ स्थान मंदिराकडे )
सकाळी १० ते १२ – देहूकर महाराजांचे वैकुंठ सोहळा कीर्तन.
१२.३० वा. पालखीचे वैकुंठ स्थान मंदिराकडून मुख्य मंदिराकडे आगमन.

हेही वाचलं का?

Back to top button