Covid 4th wave : देशात कोरोनाची चौथी लाट येण्‍याचे संकेत नाहीत : कोव्‍हिड टास्‍क फोर्स प्रमुखाचा दावा | पुढारी

Covid 4th wave : देशात कोरोनाची चौथी लाट येण्‍याचे संकेत नाहीत : कोव्‍हिड टास्‍क फोर्स प्रमुखाचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोरोनाची आणखी एक लाट येणार, असे म्‍हटलं तरी लॉकडाउन आणि त्‍याबरोबर येणारे अनेक
प्रश्‍नांच्‍या विचारांनी सर्वांना धडकी भरते. आता पुन्‍हा एकदा जगातील काही देशांमध्‍ये कोरोना रुग्‍णांची संख्‍या वाढताना दिसत आहे. मात्र भारतीयांनसाठी एक खूषखबर आहे.  (  Covid 4th wave ) अन्‍य देशांशी तुलना करता भारतात कोरोनाची चौथी लाट लाट येण्‍याचे संकेत नाहीत, असे कोव्‍हिड टास्‍क फोर्सचे प्रमुख डॉ. नरेंद्र कुमार यांनी म्‍हटलं आहे.

कोरोना महामारीही प्रत्‍येक देशांमध्‍य वेगवेगळ्या परिणाम दाखवत असल्‍याचे आजवरच्‍या तीन लाटांवरुन स्‍पष्‍ट झाले आहे. कोरोनाच्‍या सुरुवातीच्‍या काळात प्रत्‍येक देशांमधील परिस्‍थिती वेगळी होती. आता कोरोना विषाणूमध्‍ये होणार्‍या बदलाबाबत
स्‍थानिक व आंतरराष्‍ट्रीय पातळीवरही संशोधन सुरु आहे. आतापर्यंत तरी कोरोना विषाणूचे नवे म्‍यूटेशन मिळालेले नाही. जीनोम सिक्‍वेसिंगमध्‍ये कोरोनाचा विषाणूमध्‍ये बदल झाल्‍याचे निदर्शनास आलेले नाही, असेही डॉ. नरेंद्र कुमार यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हाँगकाँगमध्‍ये मोठी लोकसंख्‍या लसीकरणापासून वंचित

फेब्रुवारी २०२२पर्यंत चीनमधील हाँगकाँग महानगरात ८० वर्षांपेक्षा अधिक वर्षांचे ६९ टक्‍के ज्‍येष्‍ठ नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. तसेच सिंगापूरमध्‍ये ६ आणि न्‍यूझीलंडमधील २ टक्‍के लोकसंख्‍येचे लसीकरण झालेले नाही. भारतचा विचार करता देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेली लोकसंख्‍या ९६ टक्‍के इतकी आहे. देशात लसीकरण झाले असल्‍याने कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्‍याचे निरीक्षणही तज्‍ज्ञांनी नोंदवले आहे.

 Covid 4th wave : ओमायक्रॉनला गंभीरतेने घेणे गरजेचे

नवी दिल्‍ली येथील ‘आयजीआयबी’चे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी सांगितले की, हाँगकाँगमधील आताची परिस्‍थिती पाहता, कोरोनाच्‍या ओमायक्रॉन व्‍हेरियंट अपायकारण नाही, असा समज करुन घेवू नये. हाँगकाँगमधील मोठी लोकसंख्‍या ही लसीकरणापासून वंचित आहे. अशा लोकांना ओमायक्रॉनची लागण झाल्‍याचे दिसत आहेत. येथे मागील १२ दिवसांमध्‍ये कोरोनामुळे ३ हजार ९९३ नागरिकांचा मृत्‍यू झाला आहे. पश्‍चिम बंगालमध्‍ये नॅशनल इन्‍सिटट्‍यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्‍सचे संचालक डॉ. सौमित्र दास यांनी म्‍हटलं आहे की, “चीनसह अनेक देशामध्‍ये पुन्‍हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. मात्र त्‍याची कारणे वेगळी आहेत. ती भारताला लागू होतीलच असे नाही.”

हेही वाचलं का?

 

Back to top button