फायर फायटर की स्पायडरमॅन? | पुढारी

फायर फायटर की स्पायडरमॅन?

लंडन : एका इमारतीवरून दुसर्‍या इमारतीवर लिलया चढून जाणारा स्पायडरमॅन आपण कार्टून आणि चित्रपटांमध्ये पाहिलेला आहे. बल्गेरियात असाच एक माणूस आहे. तो शिडी घेऊन ती दोन ठिकाणी ठेवत अवघ्या पंधरा सेकंदात तीन मजली इमारतीवर सहजपणे चढून जाऊ शकतो. त्याचा एक व्हिडीओही आता व्हायरल होत आहे.

आग लागताच अग्निशमन दलाचे लोक तातडीने दाखल होतात आणि शिडी घेऊन आतील लोकांचा जीव वाचविण्यासाठी आत जात असतात. अशाच एका धाडसी फायर फायटरचा हा व्हिडीओ आहे. हा तरुण शिडी घेऊन अतिशय वेगाने एका इमारतीजवळ धावत येतो. चटकन शिडी लावून तो वर चढून जातो व शिडीवर खेचून पुन्हा वर लावून तिसर्‍या मजल्यावरील खिडकीतून आत घुसतो.’

हे सगळे करण्यासाठी तो अवघे पंधरा सेकंद घेतो. त्याचे हे अफलातून कौशल्य सोशल मीडियातील व्हिडीओत पाहून लोक थक्क झाले. बल्गेरियातील या फायर फायटरचा व्हिडीओ आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. जॉर्ज नावाच्या या तरुणाला लोक आता ‘स्पायडरमॅन’च म्हणत आहेत!

Back to top button