गोंदिया : बारावीत नापास झाल्याने ननसरीतील विद्यार्थ्याने संपविले जीवन | पुढारी

गोंदिया : बारावीत नापास झाल्याने ननसरीतील विद्यार्थ्याने संपविले जीवन

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : बारावी परिक्षेत नापास झाल्याने आमगाव तालुक्यातील ननसरी येथील विद्यार्थ्याने रेल्वेसमोर उडी स्वत:ची जीवनयात्रा संपवली. ही घटना गोंदिया-रायपूर रेल्वे मार्गावर मंगळवारी (दि.२१) सांयकाळी सातच्या सुमारास घडली. मोहित चंद्रप्रकाश पटले (१७) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ननसरी येथील मोहित या विद्यार्थ्याने मार्च-एप्रिल महिन्यात बारावीची परिक्षा दिली होती. मोहित हा आदर्श विद्यालय आमगाव येथे शिक्षण घेत असताना सैन्य भर्तीची तयारी करत होता. काल परिक्षा मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. या परिक्षेत मोहित दोन विषयात नापास झाला. परिणामी त्याने काल सायंकाळी नैराश्येतून टोकाचे पाऊल उचलत आमगाव शिवारातील महादेव पहाडीजवळ धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे ननसरीसह आमगाव तालुक्यात खळबळ उडाली असून घटनेची नोंद आमगाव पोलिसांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button