‘ती’ महिला 56 वर्षे होती ‘गर्भवती’! | पुढारी

‘ती’ महिला 56 वर्षे होती ‘गर्भवती’!

रिओ डी जनैरो : मूल जन्माला येण्याआधी महिलेला नऊ महिने पोटात ते बाळ वाढवावं लागतं आणि नऊ महिन्यांनी बाळाचा जन्म होतो. मात्र, एक महिला तब्बल 56 वर्षं गर्भवती होती. संबंधित महिलेलाही आपण गर्भवती आहोत, याची जाणीव नव्हती. नुकतेच एक दिवस या महिलेच्या पोटात दुखू लागलं असता, तिला याबद्दल समजलं. ब्राझीलमधील 81 वर्षीय डेनिएला वेरा नावाची ही महिला एका अजब स्थितीचा सामना करत होती. अचानक पोटात दुखू लागल्याने महिला डॉक्टरांकडे पोहोचली असता आपल्या पोटात कॅल्सिफाईड भ्रूण असल्याचं तिला समजलं.

डेनिएला आधीच सात महिलांची आई आहे. तिला याबद्दल आधी काहीच माहिती नव्हतं. 14 मार्चला डॉक्टरांनी तिच्यावर सर्जरी केली आणि भ्रूण हटवलं. पण, या सर्जरीनंतर डेनिएला जास्त काळ जिवंत राहू शकली नाही. दुसर्‍या दिवशीच तिचं निधन झालं. डेनिएलावर उपचार करणारे डॉक्टर पॅट्रिक डेजिरेम यांनी खुलासा केला आहे की, सर्जरीनंतर संसर्ग झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितलं की, जेव्हा गर्भपिशवी सोडून शरीरातील इतर ठिकाणी गर्भधारणा होते तेव्हा त्याला एक्टोपिक प्रेगन्सी म्हणतात. हा गर्भावस्थेचा एक प्रकार आहे, जिथे भ्रूण अन्यत्र वाढतात. तिथे ते जिवंत राहण्यास सक्षम नसतात. डेनिएलाचं असंच काहीसं झालं आहे. बाळाची वाढ योग्य होत नसल्याने ते कॅल्सीफाईड होतं. अशात ना शरीराला वेदना होतात, ना रक्तस्राव होतो. एक्स-रे काढल्यानंतरच याबाबत खुलासा होतो.

Back to top button