कच्चा मासा खाल्ला आणि कोमात गेली! | पुढारी

कच्चा मासा खाल्ला आणि कोमात गेली!

कॅलिफोर्निया : मासे खाण्याचे शौकीन काही कमी असत नाहीत. मासा एक तर प्रोटिनचे उत्तम स्रोत असतो. शिवाय, त्यात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन डी आणि अन्य पोषक तत्त्वे असतात, जे प्रकृतीसाठी बरेच पोषक असतात. याच कारणामुळे डॉक्टर देखील आजारी लोकांना मासे खाण्याचा सल्ला देतात; पण कॅलिफोर्नियात एका महिलेला मासे खाणे खूपच महाग पडले. मासा खाल्याने ती काही वेळातच कोमात गेली आणि यामुळे तिला तातडीने इस्पितळातही दाखल करावे लागले.

संबंधित बातम्या : 

कॅलिफोर्नियात राहणार्‍या 40 वर्षीय लॉरा बाराजसला मासे खाण्याचा खूपच हव्यास होता. ती जवळपास रोज मासे घेऊन यायची, स्वत: ते बनवायची आणि कुटुंबासह त्याचा आनंद लुटायची. पण नेहमीप्रमाणे एकदा सॅन जोस मार्केटमधून मासे आणून खाल्यानंतर तिची तब्येत अचानक बिघडली आणि काही तासांतच तिला श्वास घेणे दुरापास्त झाले. शिवाय, ती कोमातही गेली. अगदी किडनी खराब होण्यापर्यंत परिस्थिती बिघडली.

डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्याचे निदान केले. मात्र, त्यांनी मासा कच्चा खाल्ला गेल्याने हे इन्फेक्शन झाल्याचे सांगितले, तो खरा धक्का होता. या आठवड्यात तिच्यावर आता शस्त्रक्रिया केली गेली असून आवश्यकतेनुसार प्रत्यारोपण केले गेले.

संसर्गजन्य रोग विशेष तज्ज्ञ डॉ. नताशा स्पोटिसवूड म्हणतात, ‘कोणालाही असा संसर्ग होऊ शकतो. जर आपण दूषित काही खात असू तर त्रास होऊ शकतो. अमेरिकेत वर्षाकाठी जवळपास 150 ते 200 प्रकरणे उघडकीस येतात आणि पाचपैकी एका व्यक्तीचा यात मृत्यू होतो. प्रतिकारशक्ती कमी असेल तर अशा वेळी होणारे इन्फेक्शन आणखी धोकादायक ठरू शकते. जर दुखापत झाली असेल तर अशावेळी पाण्यात डुंबणे टाळावे. कारण, यामुळे देखील संसर्गाचा धोका वाढतो’.

हेही वाचा : 

Back to top button