परभणी : पिंपळा भत्या येथे एक लाखांची बैलजोडी चोरीला | पुढारी

परभणी : पिंपळा भत्या येथे एक लाखांची बैलजोडी चोरीला

पूर्णा,पुढारी वृत्तसेवा : पिंपळा भत्या येथे शेतातून बैलजोडी चोरल्याची भलतीच घटना समोर आली आहे. नागोराव मोरे या शेतकऱ्याच्या गट क्रमांक 186 मधील शेतामध्ये बांधलेली 1 लाख रुपये किंमतीची बैलजोडी चोरांनी पळवून नेली.

काळा रंग असलेला 50 हजार रुपये किंमतीचा एक बैल, तर तांबडा मोरा रंगाचा बैल किंमत 50 हजार रुपये असे दोन बैल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना उघडकीस चुडावा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेचा तपास सपोनि नरसिंग पोमनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोह राठोड करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button