सिडनी : मानवाचा मेंदू सुपर कॉम्प्युटरप्रमाणेच प्रभावी गणना करू शकतो, असे एका संशोधनात आढळून आले आहे. सिडनी, क्वीन्सलँड आणि केम्ब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी बायोसियन इंटरफेसच्या माध्यमातून हे समजून घेण्यासाठी व्यापक गणिती मॉडेल तयार केले आणि त्यानंतर हा निष्कर्ष जाहीर करण्यात आला आहे.
बायोसियन इंटरफेस ही सांख्यिकी पद्धत आहे. बौद्धिक अंदाज लावण्यासाठी पूर्वज्ञानाला नव्या प्रमाणांसह जोडत त्याचे विश्लेषण या माध्यमातून केले जाते. त्यामुळे, आपण कोणत्याही वस्तू किंवा जीव यांच्याबद्दल ऐकतो, त्याचवेळी त्याच्या रंगरूपाचा अंदाज आपल्या मनात समोर येतो. संशोधक डॉ. रुबेन याबाबत बोलताना म्हणाले, 'बायोसियन इंटरफेसच्या माध्यमातून मेंदूची प्राकृतिक क्षमता किती आहे, याचा शोध लावून कृत्रिम बुद्धिमत्ता व मशिन लर्निंगशी त्याचा संबंध जोडला जाऊ शकतो. म्हणजेच मेंदूची क्षमता सुपर कॉम्प्युटरप्रमाणे शक्य आहे, हे अधोरेखित होते'.