टेलिफोनची वायर सरळ का असत नाही? | पुढारी

टेलिफोनची वायर सरळ का असत नाही?

वॉशिंग्टन : सध्या टेलिफोनचा वापर बराच कमी झाला असला तरी टेलिफोनवर बोलता बोलता त्याची एकमेकात गुंफली गेेलेली वायर आपण फोनवर बोलता बोलता अनेकदा सरळ केलेली असू शकते. वास्तविक, टेलिफोन्सच्या वायरी देखील तेच काम करतात, जे अन्य वायरी करतात. ते म्हणजे वीज पुरवठा करणे. अशा परिस्थितीत टेलिफोनच्या वायरी सरळ का असत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो आणि तो साहजिकही आहे.

मागील कित्येक दशकांपासून टेलिफोनच्या वायरी सरळ न असता एकमेकात गोलाकार गुंफल्या गेल्याचे आपण पहात आलो आहोत. आता या वायरी केवळ लँडलाईन फोनसाठी नव्हे तर अनेक उद्योगात त्यांचा वापर केला जातो. आणखी अन्य प्रकारातील वायरींच्या तुलनेत या अशा कॉईल्ड वायरी आपल्या डिझाईनमुळे अधिक सुरक्षित असतात.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वायरींना प्लॅस्टिक इन्सुलेशनमध्ये कोटिंगची प्रक्रिया समाविष्ट आहे. या वायरींना एका विशेष प्लॅस्टिकच्या माध्यमातून झाकले जाते. येथे केबलला कॉईल केले जाते आणि त्यावर अनेक प्रक्रिया केल्या जातात. विशेष प्रक्रियेमुळे या वायरी नंतर खेचल्या गेल्या तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही.

अनेकदा लँडलाईन फोनवर बोलत असताना आपण रिसिव्हर फोनपासून दूर अंतरावर नेतो. पण, कॉईल वायर अधिक लवचिक असल्याने रिसिव्हर दूरपर्यंत नेणेही सहज शक्य होते. त्यानंतर रिसिव्हर पुन्हा फोनवर पूर्ववत ठेवला जातो, त्यावेळी त्याची वायर पूर्ववत स्थितीत परतते. जर कॉईल वायरऐवजी पातळ वायरींचा उपयोग झाला असता तर अशा वेळी लांब वायर फोनच्या आसपास पसरून राहिली असती आणि अशा परिस्थितीत ती गुंडाळणे कठीण झाले असते. पण, कॉईल वायर बाबत असे होत नाही. रिसिव्हर फोनवर ठेवताच ही वायर देखील पूर्वीच्या आकारात येते. सरळ वायर तुटण्याचा धोका असतो. तो धोकाही कॉईल वायरीत कमी होतो. कॉईल वायरींचा उपयोग इंटरनेट सिग्नल व डाटा ट्रान्स्फरमध्ये देखील होतो.

Back to top button