‘एक्स-59’ विमान : लंडन ते सिडनी अंतर फक्त दोन तासांतच कापणार | पुढारी

‘एक्स-59’ विमान : लंडन ते सिडनी अंतर फक्त दोन तासांतच कापणार

वॉशिंग्टन : जगातील पहिले सुपरसॉनिक विमान कॉनकार्ड आठवत असेलच. आवाजापेक्षाही दुपटीने वेग असणारे हे विमान 3 तासांपेक्षाही कमी वेळेत न्यूयॉर्कमधून लंडनला जाऊ शकत असे. या विमानाचा वेग प्रतितास चक्क 2172 किलोमीटर इतका होता. पण, त्या मानाने त्याचा खर्चही अवाढव्य असल्याने तो फाफटपसारा सांभाळणे कठीण होते. त्यादरम्यान 2000 मध्ये हाय प्रोफाईल अपघात झाला आणि त्याला कायमचा पूर्णविराम देण्यात आला. आता जवळपास 23 वर्षांच्या कालावधीनंतर याची नवी आवृत्ती येत असून, याला ‘एक्स-59’ असे नाव दिले गेले आहे.

‘एस-59’ विमानाचा वेग कॉनकार्डच्या तुलनेत बराच कमी असेल. पण, पृथ्वीतलावरील कोणत्याही ठिकाणाहून कितीही अंतर असेल तरी ते दोन तासांच्या आत कापले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या नव्या विमानाला सन ऑफ कॉनकार्ड असेही संबोधले जात आहे. या विमानाचा प्रतितास वेग 1500 किमीच्या आसपास असू शकतो आणि न्यूयॉर्क ते लंडन हा प्रवास साडेतीन तासांत पूर्ण होऊ शकेल, असा होरा आहे. लंडन ते सिडनी हे अंतर तर फक्त दोन तासांतच कापले जाऊ शकते, असा कंपनीचा दावा असून, सध्या या प्रवासाला 22 तास लागतात, हे लक्षवेधी आहे.

तज्ज्ञांनी तूर्तास या विमानाला सबऑर्बिटल फ्लाईटस् असे नाव दिले असून, जेफ बेजोसचे ब्ल्यू ओरिजिन व रिचर्ड ब्रॅनसन यांच्या व्हर्जिन गॅलेक्टिक जेट प्रोग्रामद्वारा तैनात रॉकेटप्रमाणे त्याची रचना असेल. या फ्लाईटचा प्रयोग यशस्वी झाल्यास न्यूयॉर्क ते शांघाय प्रवास केवळ 39 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. सध्या या प्रवासाला 15 तास लागतात. सध्या एलन मस्क व अन्य काही आघाडीचे व्यावसायिक सुपरसॉनिक फ्लाईट क्षेत्रातच कार्यरत असून, चीननेही यात काही प्रयोग केले आहेत.

Back to top button