54 वर्षांनंतर पत्र मिळाले; पण… | पुढारी

54 वर्षांनंतर पत्र मिळाले; पण...

पॅरिस : आजकाल फक्त आणि फक्त मोबाईलची दुनिया आहे. पण एक काळ असाही होता, ज्यात पोस्ट खात्याच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचणार्‍या पत्रांचाच आधार होता. आताही कुठल्या ना कुठल्या फितीत अडकलेली पत्रे घरापर्यंत येऊन ठेपतात, त्या वेळी ती आश्चर्याचा धक्का देणारी असतात. असाच आश्चर्याचा धक्का पॅरिसमधील एका कुटुंबाला बसला, ज्या वेळी चक्क 54 वर्षांनंतर एक पोस्टकार्ड घरी पोहोचते झाले.

‘बैंगोर डेली न्यूज’नुसार जेसिका मिन्स या महिलेला हे 54 वर्षांपूर्वीचे पोस्टकार्ड मिळाले. तिने आपला मेलबॉक्स उघडला, त्या वेळी तिला 30 वर्षांपूर्वी मयत झालेल्या एका व्यक्तीचे पत्र आढळून आले. जेसिकाने दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र 1969 मध्ये पॅरिसहून पाठवले गेले होते आणि ते चक्क 2023 मध्ये आता पत्त्यावर पोहोचले.

जेसिकाला प्रारंभी हे शेजार्‍यांसाठीचे पत्र असावे, असे वाटले. पण नंतर तिच्या लक्षात आले की, पत्त्यावरचे नाव तिच्या जुन्या घरमालकांचे होते. त्यामुळे ते त्यांना पाठवले गेलेले पत्र होते. घरमालक यापूर्वीच निर्वतले होते. मात्र 54 वर्षे हे पत्र नेमक्या कोणत्या प्रवासात अडकले होते, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. जेसिकाने हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आणि ते पाहता पाहता व्हायरल होत राहिले आहे.

Back to top button