Ship : इटलीचे 93 वर्षे जुने जहाज पुन्हा सफरीवर! | पुढारी

Ship : इटलीचे 93 वर्षे जुने जहाज पुन्हा सफरीवर!

रोम : जुन्या काळातील शिडाची जहाजे (Ship) आता केवळ चित्रातच पाहायला मिळतात. (Italy) एके काळी अशाच जहाजांमधून कोलंबस, वास्को द गामासारख्यांनी प्रवास करून नवी भूमी किंवा नवा सागरी मार्ग शोधून काढला होता. (Ship) ख्रिस्तोफर कोलंबस हा इटालियन साहसवीर होता. भारताचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेला कोलंबस अमेरिकेच्या किनार्‍यावर जाऊन पोहोचला होता. आता त्याच्याच देशातील एक जुने जहाज पुन्हा एकदा समुद्र सफरीवर निघाले आहे. हे जहाज तब्बल 93 वर्षांपूर्वीचे आहे.

इटालियन (Italy) शोधकर्ता अमेरिगो वेस्पुचीच्या नावाचे हे 93 वर्षे जुने जहाज (Ship) पुन्हा एका जगाच्या दौर्‍यावर निघाले आहे. 331 फुट लांब या जहाजात तीन मस्तूल आहेत, त्यापैकी एक सर्वात उंच 178 फुटांचे आहे. 1930 मध्ये 74-गन जहाज म्हणून याचे बांधकाम झाले होते. इटालियन खाद्यपदार्थ, वाईन आणि संस्कृतीची ओळख वाढवण्यासाठी दोन वर्षांच्या जागतिक दौर्‍यावर पाठवण्याची सरकारची योजना आहे. 1 जुलैपासून हे जहाज नव्या प्रवासाला सुरुवात करेल.

.हेही वाचा

onion: उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे लाभदायक

Robot : आता गांडुळाच्या रूपातही आला रोबो!

Back to top button