onion: उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे लाभदायक | पुढारी

onion: उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे लाभदायक

नवी दिल्ली : कांदा-भाकरी (onion) हे जुन्या काळापासून कष्टकर्‍यांचे, गरिबांचे अन्न बनलेले आहे. अनेकांना जेवण करताना कच्चा कांदा खाण्याची सवय असते. जेवताना कच्चा कांदा (onion) खाणे हे जेवणाची लज्जत वाढवणारे असतेच, शिवाय असा कच्चा कांदा खाणे हे आरोग्यासाठीही लाभदायक ठरते. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशा स्थितीत शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कांद्याचे सेवन लाभदायक ठरते असे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे. कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराला आवश्यक असे घटक मिळतात.

उन्हाळ्यात कांदा (onion) खाण्याचा फायदा म्हणजे उष्माघातापासून बचाव होतो. कांदा तुम्हाला उष्माघात टाळण्यास मदत करू शकतो. म्हणूनच उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो. कच्चा कांदा खाण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. कांद्यामध्ये असे अनेक पोषक तत्त्व आढळतात जे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्याचे काम करतात. त्याचबरोबर ते शरीराला आतून थंड ठेवतात.

कच्चा कांदा खाण्याने पचनक्रिया चांगली राहते. उन्हाळ्यात बहुतेकांना पचनाच्या समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत कच्च्या कांद्याचे सेवन करावे, त्यामुळे पचन समस्या सुटण्यास मदत होते. याचे सेवन करताना त्यात लिंबाचा रसही टाकता येतो. असे केल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते तसेच आराम मिळतो.

-हेही वाचा

Water : पाण्याची शुद्धता तपासणारे उपकरण

Space : ‘एलियन्स’साठी अंतराळात पाठवले जात आहे ‘ज्युस’!

Back to top button