Robot : आता गांडुळाच्या रूपातही आला रोबो! | पुढारी

Robot : आता गांडुळाच्या रूपातही आला रोबो!

लंडन : जगात विविध कामांसाठी अनेक प्रकारचे व रूपांचे रोबो (Robot) बनवण्यात आलेले आहेत. अनेक दशकांपासून वैज्ञानिक सॉफ्ट रोबो बनवत आहेत. आता ‘शेतकर्‍यांचा मित्र’ म्हटल्या जाणार्‍या गांडुळाच्या रूपातही असा रोबो (Robot) बनवण्यात आला आहे. गांडूळ मातीची मशागत करीत असतात व जमिनीला अधिक सुपीकही बनवत असतात.

स्वीडिश युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल सायन्सेसमधील संशोधिका एल्सा एराजोला यांनी सांगितले (Robot) की गांडूळ हे बरेच लवचिक असतात. ते अशीही कामे करू शकतात जी यंत्राकडून करता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासारखे हे रोबो विकसित करण्यात आले आहेत. ते विज्ञान, संरक्षण, वैद्यकीय आणि कृषीसारख्या अनेक क्षेत्रांत उपयुक्त ठरू शकतील. इटालियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सॉफ रोबोटिक्स ग्रुपच्या संशोधकांनी एक असा रोबो विकसित केला आहे जो गांडुळासारखे सरपटत चालतो. तेथील इंजिनिअर रिद्धी दास यांनी सांगितले की या रोबोचे डिझाईन अनोखे आहे.

या रोबो गांडुळाला पुढे व मागे सरकण्यासाठी पॉझिटिव्ह व निगेटिव्ह प्रेशरचा वापर केला जातो. हा रोबो हलक्या वजनाच्या डंबेलसारखा आहे. त्यामध्ये जेल भरलेले असून ते त्याच्या हालचालींना मदत करते. हे रोबो अतिशय चांगल्याप्रकारे जमिनीत भुयार खोदू शकतात. त्यांचा वापर खाणकाम, अ‍ॅग्रीकल्चरल सेन्सिंग आणि अन्य ग्रहांवरील मातीचे नमुने गोळा करण्यासाठीही होऊ शकतो. तसेच भूकंप, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात शोधकार्य, बचावकार्य यामध्येही होऊ शकतो.

.हेही वाचा

Space : ‘एलियन्स’साठी अंतराळात पाठवले जात आहे ‘ज्युस’!

Lifestyle : दुपारी जेवल्यावर झोप का येते?

Back to top button