प्राचीन माया संस्कृतीमधील अनोखे मंदिर | पुढारी

प्राचीन माया संस्कृतीमधील अनोखे मंदिर

न्यूयॉर्क : मेक्सिकोत माया संस्कृतीमधील एक अनोखे मंदिर पाहायला मिळते. त्याचे नाव आहे ‘चिचेन इत्जा’. हा एक स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ ‘इत्जाच्या विहिरीच्या मुखाशी’ असा होतो. चिचेन इत्जा हे मेक्सिकोतील सर्वात प्राचीन स्थळांपैकी एक आहे.

या मंदिराची उभारणी इसवी सनपूर्व 600 या काळात झाली. हे मंदिर सुमारे 5 किलोमीटरच्या क्षेत्रात फैलावलेले आहे. त्याची उंची 79 फूट असून आकार पिरॅमिडसारखा आहे. या मंदिरात वर जाण्यासाठी चारही बाजूंनी सुबक पायर्‍या केलेल्या आहेत. याठिकाणी एकूण 365 पायर्‍या असून प्रत्येकी चार कोनात 91 पायर्‍या आहेत.

काही लोकांचे असे म्हणणे आहे की यापैकी प्रत्येक पायरी एका दिवसाची प्रतीक आहे. चिचेन इत्जा हे माया संस्कृतीमधील सर्वाधिक लोकसंख्येचे व सर्वात मोठे शहर होते. जगातील आश्चर्यांमध्ये चिचेन इत्जाच्या या मंदिराचा समावेश होतो.

Back to top button