विमानात परफ्यूम, डिओड्रंट नेण्यास का असते मनाई? | पुढारी

विमानात परफ्यूम, डिओड्रंट नेण्यास का असते मनाई?

नवी दिल्ली : घामाच्या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी आणि मन प्रसन्न करणार्‍या सुंगधासाठी अनेक जण परफ्यूम आणि डिओड्रंटचा वापर करतात. यामुळे दुर्गंधीपासून सुटका मिळून सुंगधामुळे फ्रेशही वाटतं, पण विमानात परफ्यूम आणि डिओड्रंट नेण्यास मनाई आहे, हे तुम्हाला माहित आहे का? यामागे नक्की कोणते कारण आहे जाणून घ्या…

इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून विमान कंपन्या आणि विमान प्रवासासाठी काही नियम आहेत. जगभरातील सर्व विमान कंपन्या इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने बनवलेले नियम पाळतात. या नियमांनुसार विमानात परफ्यूम आणि डिओड्रंट नेण्यास मनाई आहे. अनेक विमान कंपन्यांच्या वेबसाईटवर हे देखील स्पष्टपणे लिहिलेलं आहे की, प्रवासी त्यांच्या सामानाच्या बॅगेजमध्ये किंवा चेक-इन बॅगेजमध्ये परफ्यूम किंवा डिओड्रंट ठेवू शकत नाहीत. काही कंपन्याच्या वेबसाईटवर किती प्रमाणात परफ्यूम नेण्यास परवानगी आहे, हेही येथे सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे. विमानात परफ्यूम किंवा डिओड्रंट न नेण्यामागे अनेक कारणं आहेत. ती अशी… ज्वलनशीलता : परफ्यूम, डिओड्रंट किंवा सेंट यामध्ये अल्कोहोल असते. हे ज्वलनशील असते. विमानात आग लागल्यास, यामुळे आग आणखी भडकू शकते. घातक घटक : परफ्यूम आणि डिओड्रंटमध्ये प्रोपेलेंट्स आणि सॉल्व्हेंटस्सारखे अनेक धोकादायक घटक देखील असू शकतात. श्वासावाटे हे घटक शरीरात गेल्यास किंवा त्वचेच्या संपर्कात आल्यास मनुष्यासाठी हानिकारक ठरू शकतं. अ‍ॅलर्जी : काही लोकांना परफ्यूमची अलर्जी असते. त्यामुळे विमानात उपस्थित प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अलर्जी असल्यास त्या व्यक्तीला परफ्यूममुळे शिंकणे, खोकला यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

तीव्र वासः परफ्यूम जास्त शक्तिशाली असल्यास त्यांचा तीव्र सुगंध इतर प्रवाशांसाठी त्रासदायक ठरू शकतो. विमानासारख्या बंद ठिकाणी हा सुगंध अधिक लवकर पसरू शकतो आणि लोकांसाठी ते डोकेदुखीसारखा त्रास देऊ शकते.

Back to top button