भोजनातील कॅलरी सांगणारे अ‍ॅप! | पुढारी | पुढारी

भोजनातील कॅलरी सांगणारे अ‍ॅप! | पुढारी

नवी दिल्‍ली : लठ्ठपणाशी झगडत असलेले तसेच मधुमेह किंवा हृदयविकाराने पीडित लोक नेहमीच खाद्यपदार्थांमधील कॅलरीजबाबत सतर्क असतात. आता अशा लोकांना भोजनात किती कॅलरीज आहेत हे जाणून घेणे सोपे ठरणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) ची हैदराबादमधील प्रयोगशाळा ‘राष्ट्रीय पोषण संस्थान’ (एनआयएन) ने यासाठी एक मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे.

‘एनआयएन’ने पोषण स्तरातील सुधारणेसाठी ‘न्यूट्रिफाय इंडिया नाऊ’ नावाचे हे अ‍ॅप लाँच केले आहे. ते विकसित करणार्‍या संशोधकांनी म्हटले आहे की हे अ‍ॅप पोषणासंबंधी गरजांबाबत जागृती निर्माण करण्याचे कार्य करील. भारतीय आहार आणि त्यामधील पोषक मूल्यांबाबत हे अ‍ॅप विस्तृत माहिती देऊ शकते. ऊर्जा संतुलनाबाबतचा लेखाजोखाही हे अ‍ॅप देऊ शकते. भारतीय लोकसंख्येच्या विशिष्ट डेटाबेसच्या आधारे हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. ते भारतीय खाद्यपदार्थांमधील कॅलरीज, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, खनिजे आणि रेसिपीसहीत पोषक तत्त्वांचीही माहिती देऊ शकते. भारतीय वापरकर्त्यांना नजरेसमोर ठेवून ते विकसित करण्यात आले आहे. ते सतरा भारतीय भाषांमध्ये खाद्यपदार्थांची नावे उपलब्ध करते.

Back to top button