वॉशिंग्टन : सूर्यावर होणार स्फोट | पुढारी

वॉशिंग्टन : सूर्यावर होणार स्फोट

वॉशिंग्टन : पृथ्वीवर वेळोवेळी संकटे येतच असतात. याबाबत शास्त्रज्ञ नियमितपणे इशाराही देत असतात. या शास्त्रज्ञांनी आपली पृथ्वी नष्ट होईल, असा पुन्हा एकदा दावा केला आहे. याशिवाय कशामुळे पृथ्वी नष्ट होणार आहे, हेसुद्धा त्यांनी सांगितले.

Sun www.pudhari.news
वॉशिंग्टन : सूर्यावर होणार स्फोट

दीर्घकाळ संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांनी वरील दावा केला आहे. त्यांच्या मते, काही अब्ज वर्षांनंतर सूर्यावर शक्तिशाली स्फोट होऊन तो फुटेल. यामुळे पृथ्वीसह संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होईल, या शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार सूर्य सध्या तरुण आहे. मात्र, सुमारे पाच अब्ज वर्षांनंतर सूर्यामध्ये शक्तिशाली स्फोट होईल. यामध्ये पृथ्वीही नष्ट होण्याची शक्यता आहे.

खगोलशास्त्रज्ञ पाओलो टेस्टा यांच्या मते, सूर्याचे वय आता पाच अब्ज वर्षांहून कमी आहे. सूर्य हा मध्य वर्गातील तारा आहे. सूर्याचे वय एकूण 10 अब्ज वर्षांइतके असू शकते. अथवा त्याहून अधिक काळ असू शकते.

सूर्यामध्ये असलेले हायड्रोजन कोअर जेव्हा काम करणार नाही, तेव्हा वरील घटना घडेल. मात्र, अशी घटना तब्बल 5 अब्ज वर्षानंतर घडेल. जेव्हा हायड्रोजन कोअर काम करणार नाही, त्यावेळी सूर्य उष्णतेची निर्मिती करू शकणार नाही. यामुळे दुसरे ग्रह थंड पडतील. सूर्याशेजारचा बुध व शुक्र या ग्रहांबरोबरच पृथ्वीही नष्ट होण्याची शक्यता आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या मते, सूर्याच्या अखेरच्या वेळी महासागर सुकून जातील आणि मानव जातही नष्ट होईल. ही घटना 5 अब्ज वर्षांनी घडण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button