Virat's Daughter Vamika : विराट-अनुष्‍काची 'वामिका' प्रथमच आली कॅमेर्‍यासमोर..!( व्‍हिडीओ व्‍हायरल ) - पुढारी

Virat's Daughter Vamika : विराट-अनुष्‍काची 'वामिका' प्रथमच आली कॅमेर्‍यासमोर..!( व्‍हिडीओ व्‍हायरल )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्‍का हे सिलेब्रिटी कपल नेहमीच चर्चेत असते. त्‍यांनी मागील एक वर्ष कन्‍या वामिकाला (Virat’s Daughter Vamika ) माध्‍यम आणि कॅमेर्‍यापासून अलिप्‍त ठेवले होते. मात्र आता प्रथमच वामिकाचा फोटो आणि व्‍हिडीओ समोर आला आहे. रविवारी केपटाउन येथे भारत विरुद्‍ध दक्षिण आफ्रिका वन डे सामना सामना पाहण्‍यासाठी अनुष्‍का ही वामिकासह स्‍टेडियमवर आली होती. यावेळी अनुष्‍काने वामिकाला कडेवर घेतलेला व्‍हिडीओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे.

Virat’s Daughter Vamika : …आणि वामिकाची पहिली झलक आली समाेर

भारत विरुद्‍ध दक्षिण आफ्रिका वन डे सामन्‍यावेळी स्‍टार स्‍पोर्ट्‍सच्‍या कॅमेर्‍यामध्‍ये अनुष्‍काबरोबर वामिकाही कैद झाली. काही क्षणातच चिमुकल्‍या वामिकाची पहिली झलक सोशल मीडियावर व्‍हायरल झाली. या व्‍हिडीओमध्‍ये अनुष्‍का ही वामिकाला कडेवर घेतलेले दिसत आहे. दक्षिण आफ्रिका दौर्‍यावेळी ११ जानेवारी रोजी विराट आणि अुनष्‍काने वामिकाचा पहिला वाढदिवस साजारा केला. गेली एक वर्ष विराट आणि अनुष्‍का हे वामिकाला माध्‍यम आणि कॅमेर्‍यापासून लांब ठेवण्‍यात यशस्‍वी ठरले होते.

दक्षिण आफ्रिका दौर्‍यावेळीच वामिकाचे फोटो किंवा व्‍हिडीओ घेवू नयेत, असे आवाहन अनुष्‍काने माध्‍यमांना केले होते. त्‍यावेळी तिच्‍या सुचनेचे पालन माध्‍यमांनी केले होते. यावर अुनष्‍काने सोशल मीडियाच्‍या माध्‍यामतून पत्रकारांचे आभारही मानले होते. आत पहिल्‍यांदा वामिकाचे फोटो आणि व्‍हिडीओ व्‍हायरल झाले असून, विराट आणि अनुष्‍काच्‍या चाहत्‍यांनी त्‍याचे स्‍वागत केले आहे.

 

हेही वाचलं का? 

Back to top button