Lok Sabha Election 2024 Voting | सकाळी ११ पर्यंत महाराष्ट्रात सर्वात कमी, त्रिपुरात सर्वाधिक मतदान | पुढारी

Lok Sabha Election 2024 Voting | सकाळी ११ पर्यंत महाराष्ट्रात सर्वात कमी, त्रिपुरात सर्वाधिक मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यांतील ८८ लोकसभा मतदारसंघांत आज शुक्रवारी (दि. २६ एप्रिल) रोजी दुसर्‍या टप्प्यात मतदान होत आहे. दरम्यान, सकाळी ११ पर्यंत महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ मतदारसंघांत सर्वात कमी म्हणजे १८.८३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर त्रिपुरा येथे सर्वांधिक ३६.४२ टक्के मतदान झाले होते. (Lok Sabha Election 2024 Voting)

सकाळी ११ पर्यंत आसाममध्ये २७.४३ टक्के, बिहार २१.६८ टक्के, छत्तीसगड ३५.४७ टक्के, जम्मू- काश्मीर २६.६१ टक्के, कर्नाटक २२.३४ टक्के, केरळ २५.६१ टक्के, मध्य प्रदेश २८.१५ टक्के, मणिपूर ३३.२२ टक्के, राजस्थान २६.८४ टक्के, उत्तर प्रदेश २४.३१ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये ३१.२५ टक्के मतदान झाले होते.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानात केरळच्या वायनाडमधून लढणारे काँग्रेस नेते राहुल गांधी, राजस्थानच्या कोटा येथून रिंगणात असलेले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघात भाजपकडून लढणार्‍या अभिनेत्री हेमा मालिनी, रामाची भूमिका साकारणारे मेरठमधील उमेदवार अभिनेते अरुण गोविल यांच्यासह तीन केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि इतर अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. दुसर्‍या टप्प्यात एकूण १,१९८ उमेदवार रिंगणात असून, त्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Lok Sabha Election 2024 Voting)

 हे ही वाचा :

 

Back to top button