ब्रेकिंग : ममता बॅनर्जी पुन्‍हा जखमी, हेलिकॉप्टरमध्ये बसताना पाय घसरला | पुढारी

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी पुन्‍हा जखमी, हेलिकॉप्टरमध्ये बसताना पाय घसरला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा जखमी झाल्या आहेत. दुर्गापूर येथे हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना त्यांचा पाय घसरला. त्याला सध्या आसनसोल येथे नेण्यात आल्‍याचे वृत्त आहे.

ममता बॅनर्जी आज (दि. २७)  दुर्गापूर येथ[y पश्चिम वर्धमान येथे हेलिकॉप्टरमध्ये बसत हाेत्‍या. यावेळी  पाय घसरल्याने त्‍या हेलिकॉप्टरमध्ये पडल्या. त्‍यांना किरकाेळ दुखापत झाली आहे. सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्‍यांना मदत केली. यानंतर त्‍यांनी आसनसोलचा प्रवास सुरू ठेवला आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

याआधीही ममता बॅनर्जी अनेकवेळा जखमी झाल्‍या आहेत. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी त्‍यांच्‍या राहत्या घरी चालताना पडल्‍या होत्‍यह यावेळी त्‍यांच्‍या डोक्याला दुखापत झाली होती. यावेळी त्यांना तातडीने एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्‍यात आले होते.

विधानसभा निवडणुकीवेळीही जखमी, व्हिलचेअरवरुन प्रचार

२०२१ विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये प्रचार करत असताना एक दुर्घटना घडली. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. आपल्याला जाणीवपूर्वक कारच्या जवळ असताना काही लोकांनी ढकललं, असा आरोप त्‍यांनी केला होता. या घटनेनंतर ममता बॅनजी यांच्‍या पायाला प्लॅस्टर करण्यात आले. यानंतर त्‍यांनी व्हिलचेअरवरुन विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला होता. या निवडणुकीत पश्‍चिम बंगालमधील सत्ता अबाधित ठेवण्‍यास त्‍यांना यश आले होते.

हेही वाचा : 

Back to top button