प्रवाशांनो सामवधान! CSMT स्थानकात प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी आज-उद्या रात्री पॉवर ब्लॉक | पुढारी

प्रवाशांनो सामवधान! CSMT स्थानकात प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी आज-उद्या रात्री पॉवर ब्लॉक

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सीएसएमटी स्थानकात लांब पल्याच्या गाड्यांच्या प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम सुरु आहे. या कामासाठी शुक्रवार १० आणि शनिवार ११ मे रोजी रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान शुक्रवारी रात्री लोकलसह मेल-एक्सप्रेसच्या वाहतूकीत काही बदल करण्यात आले आहे. तर शनिवारी रात्री १२.३० नंतर भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यानची लोकल वाहतूक पहाटे साडे चार वाजेपर्यत पुर्णपणे बंद राहणार आहे.

शुक्रवारी रात्री भायखळा ते सीएसएमटी दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान १२५०२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस,२२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, ११०५८ अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस,११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, १२८१० हावडा-सीएसएमटी मेल दादर स्थानकांपर्यतच चालविण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी स्थानकातून कल्याणकरिता रात्री ९.५४ वाजता सुटणारी लोकल आणि कल्याण स्थानकातून सीएसएमटीकरिता रात्री सुटणारी ११.०५ची लोकल रद्द केली आहे.

शनिवारी रात्री भायखळा ते सीएसएमटी दरम्यान अप-डाउन जलद मार्गावर आणि वडाळा रोड ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप-डाउन दोन्ही मार्गावर ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान १२८७० हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, ०१०८० मऊ-सीएसएमटी विशेष,१२०५२मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस,२२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस,११०५८ अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस,११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस,०२१४० नागपूर-सीएसएमटी सुपरफास्ट स्पेशल,१२८१० हावडा-सीएसएमटी मेल या गाड्या दादर स्थानकापर्यतच चालविण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील भायखळा ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते सीएसएमटी स्थानकांदरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे.

ब्लॉक पूर्वी (शेवटच्या लोकल)

सीएसएमटी -कसारा रात्री १२.१४
कल्याण-सीएसएमटी रात्री १०.३४
सीएसएमटी-पनवेल रात्री १२.१३
पनवेल-सीएसएमटी रात्री १०.४६

ब्लॉक नंतर (पहिल्या लोकल)

सीएसएमटी-कर्जत पहाटे ४.४७
ठाणे-सीएसएमटी पहाटे ४
सीएसएमटी-पनवेल पहाटे ४.५२
सीएसएमटी-बांद्रा पहाटे ४.१७

Back to top button