‘NIA’ टीमवर हल्‍ला; ममता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, “स्थानिक लोकांनी…”

‘NIA’ टीमवर हल्‍ला; ममता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, “स्थानिक लोकांनी…”
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्‍ट्रीय तपास संस्‍थेचे (NIA) पथक मेदिनीपूरमध्‍ये मध्यरात्रीनंतर छापा टाकण्यासाठी का आले?, विचित्र वेळेत छापे टाकण्यासाठी पथकाला आवश्यक परवानगी होती का, असे सवाल करत स्थानिक लोकांनी मध्‍यरात्री गावात अनोळखी व्यक्ती आल्यावर जे करायला हवे होते तेच केले, अशी प्रतिक्रिया पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. ( Attack on NIA team ) दरम्‍यान, पश्‍चिम बंगाल भाजपने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तृणमूल काँग्रेसने आचारसंहितेचे उल्‍लंघन केल्‍याचा आरोप केला आहे.

२०२२ मध्‍ये झालेल्‍या बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज पहाटे दिनीपूर जिल्ह्यातील भूपतीनगर भागात NIA अधिकार्‍यांचे पथक गेले होते. यावेळी स्‍थानिकांनी त्‍यांच्‍यावर हल्‍ला केला . या घटनेने राज्‍यात खळबळ उडाली. या घटनेचा भाजपने तीव्र निषेध केला आहे.

NIA पथकाने मध्‍यरात्री छापा का टाकला?

ममता बॅनर्जी म्‍हणाल्‍या की, "NIA पथकाने मध्‍यरात्री छापा का टाकला?, त्यांनी ही कारवाई करण्‍यासाठी पोलिसांची परवानगी घेतली होती का? मध्यरात्री त्या ठिकाणी कोणी अनोळखी व्यक्ती आल्यास स्थानिकांनी तशीच प्रतिक्रिया दिली. स्थानिक लोकांनी मध्‍यरात्री गावात अनोळखी व्यक्ती आल्यावर जे करायला हवे होते तेच केले."
यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा संदर्भ देत ममता बॅनर्जी म्‍हणाल्‍या की, "निवडणुकीच्या आधी ते लोकांना का अटक करत आहेत? भाजपला वाटते की, ते प्रत्येक बूथ एजंटला अटक करतील? 'एनआयए'कडे काय अधिकार आहेत? हे सर्व भाजपला पाठिंबा देण्यासाठी केले जात आहे. भाजपच्या या घाणेरड्या राजकारणाविरुद्ध लढा देण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन करत असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
'एनआयए' अधिकाऱ्यांच्या पथकाने आज सकाळी बॉम्‍बस्‍फोट प्रकरणाशी संबंधित दोघांना अटक केली. यावेळी हे पथक कोलकाता येथे परत जाताना जमावाने त्‍यांच्‍या वाहनावर हल्ला केला. स्थानिकांनी वाहनाला घेराव घातला. त्यावर दगडफेक केली. या हल्‍ल्‍यात एनआयएचा एक अधिकारी देखील जखमी झाला आहे," असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एनआयएने याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. दरम्यान, या हल्ल्यावर भाष्य करताना भाजपच्या बंगाल युनिटने या घटनेला घृणास्पद म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बिहारच्या पटना येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले, "हे पहिल्यांदाच घडले आहे का? अंमलबजावणी संचालनालयावर हल्ला झाला की नाही? संदेशखलीचे सत्य बाहेर आले की नाही? आता एनआयए, कारण जेव्हा ते दहशतवाद्यांशी

राज्‍यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस : सुवेंदू अधिकारी

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते (LoP), सुवेंदू अधिकारी म्हणाले, "पश्चिम बंगालची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. निवडणूकआयोगाने भूपतीनगर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, SDPO Contai, पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि राज्‍याचे पोलीस महासंचालकांवर योग्य कारवाई करावी." अशी मागणीही त्‍यांनी केली.

संदेशखाली येथे ईडीच्या अधिका-यांवर हल्ला झाल्यानंतरही ममता बॅनर्जींनी वारंवार चिथावणी दिल्याने तृणमूल काँग्रेसचे नेते एनआयए अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचे धाडस करू शकले. नुकतेच कूचबिहारमधील माथाभंगा येथील राजकीय कार्यक्रमात त्यांनी एनआयएबद्दल टीका केली होती, असेही असेही अधिकारी यांनी म्‍हटले आहे.

प. बंगालचे नागरिक म्हणून लाज वाटते : भाजप नेत्‍या अग्निमित्र पॉल

या हल्‍ल्‍याबाबत भाजप नेत्‍या अग्निमित्र पॉल म्हणतात, "पश्चिम बंगालचे नागरिक म्हणून आम्हाला लाज वाटते. काही दिवसांपूर्वी आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांवरही हल्ले झाल्याचे पाहिले होते. आज एनआयएवर हल्ला झाला. आज जे घडले त्याची जबाबदारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घ्यावी लागेल."

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news