Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात | पुढारी

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात

पुढारी ऑनलाईन डेस्क : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या कारला बुधवारी (दि. २४) पश्चिम बंगालमध्ये अपघात झाला. बंगालच्या बर्दवान जिल्ह्यातील एका अधिकृत कामावरून ती कोलकात्याला परतत असताना ही दुर्घटना . या अपघातात तिच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती हिंदूस्तान टाईम्सने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता यांची गाडी भरधाव वेगाने जात होती. दरम्यान एका मार्गावर उंचवटा आला आणि त्यांच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. अचानक ब्रेक लागल्याने कारमध्ये बसलेल्या लोकांचे तोल गेला आणि ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली, ममता बॅनर्जी यांना किती गंभीर दुखापत आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. त्यांच्या कपाळावर किरकोळ जखम झाल्याचे सांगितले जात आहे. ममता बॅनर्जी बर्दवानमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आटोपून कोलकाता येथे परतत होत्या. यादरम्यान त्यांच्या कारला वाटेत अपघात झाला. मात्र, दुखापत गंभीर नसल्याने ममताच्या हितचिंतकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Back to top button