कोण आहे शेख शाहजहान? ज्‍याच्‍यामुळे ममता बॅनर्जी सरकार आले ‘बॅकफूट’वर

संदेशखाली महिला लैंगिक शाेषण प्रकरणातील आराेपी शहाजहान शेख.
संदेशखाली महिला लैंगिक शाेषण प्रकरणातील आराेपी शहाजहान शेख.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सुमारे दोन महिन्‍यांहून अधिक काळ फरार असलेला तृणमूल काँग्रेसचा 'बाहुबली' नेता शेख शाहजहान ( Sheikh Shahjahan) याला संदेशखाली (Sandeshkhali Case) प्रकरणी अखेर आज ( दि. २९ फेब्रुवारी ) पहाटे पश्‍चिम बंगाल पोलिसांनी अटक केली. त्‍याच्‍या अटकेसाठी भाजपने राज्‍य सरकारविरोधात आंदोलन छेडले. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपमध्‍ये आरोप-प्रत्‍यारोपांच्‍या फैरी झडल्‍या. ग्रामस्‍थांसह महिलांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. या प्रकरणी दाखल याचिकांवरील सुनावणीवेळी पश्‍चिम बंगाल सरकारला कोलकाता उच्‍च न्‍यायालयाने फटकारलेही. एकूणच, मागील काही दिवस पश्‍चिम बंगालमध्‍ये शेख शाहजहान या नावाभोवती सारे राजकारण ढवळून निघाले. (Sandeshkhali Case : Who is Sheikh Shahjahan?) ममता बॅनर्जी सरकारला अडचणीत आणणार्‍या तृणमूलचा 'बाहुबली' नेता शेख शाहजहान याच्‍याविषयी जाणून घेवूया …

ड्रायव्‍हर… माकपचा कार्यकर्ता….मत्‍स्‍यशेती

पश्चिम बंगाल राज्‍यातील २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखाली गाव आहे. या गावात राजकीय वरदहस्‍तातून दहशत माजविणारा शेख शाहजहान हा ऐककाळी ड्रायव्‍हर तर कधी ट्रेकर्सचा मदतनीस म्‍हणून काम करत असे. त्‍याची राजकारणातील एन्‍ट्री त्‍याच्‍या मामांमुळे झाली. त्‍याचे मामा मुस्‍लेम शेख हे कम्‍युनिस्‍ट पार्टी ऑफ इंडिया (माकप)चे नेते होते. राजकारणाबरोबरच जोड व्‍यवसाय म्‍हणून त्‍याने मत्‍स्‍यशेती सुरु केली. काही दिवसांमध्‍येच त्‍याने संदेशखाली परिसरातील मत्स्यशेतींवर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली. अल्‍पावधीत पैशाच्‍या जोरावर त्‍याने स्‍वत:ची टोळीच तयार केली. सुरुवातीच्‍या काळात तो माकपच्‍या स्थानिक नेत्यांच्या संपर्कात असायचा. निवडणुकीवेळी त्यांना मदत करायचा, असे स्‍थानिक सांगतात. (Sandeshkhali Case : Who is Sheikh Shahjahan?) म

अल्‍पवधीत बनला तृणमूलचा बडा नेता

२०११ मध्‍ये पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाले. डाव्‍यांचा पराभव करत ममता बॅनर्जी यांनी राज्‍याची सत्ता काबीज केली. राज्‍यातील राजकीय वारे ओळखून दोन वर्षांनी म्‍हणजे २०१३ मध्‍ये शेख शाहजहान याने तृणमूल काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला. माजी राज्यमंत्री आणि TMC नेत्या ज्योती प्रिया मल्लिक यांचा जवळचा सहकारी म्‍हणून त्‍याची पक्षात ओळख बनली. ज्‍योती प्रिया मल्लिक सध्‍या कोट्यवधींच्या शिधावाटप घोटाळ्यातील कथित सहभागामुळे तुरुंगात आहेत. (Sandeshkhali Case : Who is Sheikh Shahjahan?) म

वार्षिक उत्‍पन्‍न १९ लाख, १.९० कोटीच्‍या बँक ठेवी

२०२३ मध्‍ये शेख शाहजहान याने पंचायत निवडणूक लढवली होती. यावेळी त्‍याने सादर केलेल्‍या माहितीनुसार, त्‍याचे वार्षिक उत्‍पन्‍न हे १९ .८ लाख रुपये इतके आहे. तर १.९ कोटींहून अधिक बँक ठेवी आहेत. त्‍याच्‍याकडे ४३ एकर जमीन असून, त्‍यांचे बाजारमूल्‍य ४ कोटी रुपये इतके आहे. सरबेरियामध्ये सुमारे 1.5 कोटी रुपयांचे त्‍याचे घर आहे.

Sandeshkhali Case : शाहजहान समर्थकांचा ईडी पथकावर हल्‍ला

शेख शाहजहान याने अल्‍पवधीत तृणमूलमध्‍ये आपली स्‍वतंत्र ओळख बनवली. पक्षात आमदार आणि मंत्र्यांपेक्षाही त्‍याचे राजकीय 'वजन' मोठे होते. ५ जानेवारीला त्‍याच्‍या घराची झडती घेण्‍यासाठी ईडीच्‍या अधिकार्‍यांनी त्‍याच्‍या घरावर छापा टाकला. तेव्‍हा त्‍याच्‍या ८०० ते हजार समथंकांनी ईडी पथकावर हल्‍ला केला होता. यामध्‍ये तीन अधिकारी जखमी झाले होता. तेव्‍हापासून शेख शाहजहान हा फरार होता. त्‍यानेच हा हल्‍ला घडवून आणल्‍याचा आरोप झाला आहे.

सर्वात आधी तक्रार शाहजहानकडे द्या ; मग पोलिसांकडे या…

संदेशखाली परिसरात शाहजहान शेख याची प्रचंड दहशत होती. एखादा ग्रामस्‍थ तृणमूलविरोधात तक्रार देण्‍यासाठी पोलिसांकडे गेला तर पोलीस त्‍याला प्रथम शाहजहानकडे जाण्‍याचा सल्‍ला देत असत. शाहजहान 'भाई' नावाने तो परिसरात प्रसिद्ध होता. आपल्‍याविरोधात पोलीसात तक्रार होणार नाही, याची खबरदारी त्‍याने घेतली होती. शाहजहान शेख विरोधात कोलकाता उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल झाली होती. राज्याचे महाधिवक्ता किशोर दत्ता यांनीउच्च न्यायालयाला माहिती दिली होती की, गेल्या चार वर्षांत त्याच्याशी संबंधित ४३ गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी ४२ गुन्ह्यांमध्ये आरोपपत्रे सादर केली आहेत, तर काही प्रकरणांमध्ये तो फरार असल्याचेही स्पष्ट केले होते,

Sandeshkhali Case : अटकेच्‍या मागणीसाठी ग्रामस्‍थ उतरले रस्‍त्‍यावर

संदेशखाली गावात काही महिलांवर सामूहिक लैंगिक अत्याचार तसेच गरिबांची जमीन बळकावण्याचे प्रकार झाल्याचा तक्रार शाहजहान शेखविरोधात दाखल झाल्‍या . यानंतर सत्तारूढ तृणमूल काँग्रेस तसेच विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्‍यारोप सुरु होते. शाहजहान शेखच्या अटकेच्या मागणीसाठी गावकरी, बहुतेक महिलांनी रस्त्यावर उतरले. या प्रकरणी दाखल याचिकांवरील कोलकाता उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली . यावेळी न्‍यायालयाने आरोपीवर कारवाईस झालेल्‍या दिरंगाईबाबत सरकारला फटकारले होते. या प्रकरणी चार वर्षांपूर्वी राज्य पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्‍यासाठी चार वर्षे कशी लागली, अशी विचारणाही उच्‍च न्‍यायालयाने केली होती. Sandeshkhali Case : Who is Sheikh Shahjahan?

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news