National Sports Games : महाराष्ट्राच्या रोल बॉल महिला संघाची विजयी सलामी | पुढारी

National Sports Games : महाराष्ट्राच्या रोल बॉल महिला संघाची विजयी सलामी

पणजी; पुढारी वृत्तसेवा : युवा कर्णधार श्वेता कदमच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र महिला रोल बॉल संघाने मंगळवारी (दि.३१) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शानदार विजय सलामी दिली. (National Sports Games)

सामन्यामध्ये महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेश संघावर ६-४ अशा फरकाने विजय मिळवला. मानसी पाटील, महेक आणि श्वेता कदम यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाला मोठा विजय नोंदवता आला. मुख्य प्रशिक्षक अमित पाटील यांनी विजय सलामीसाठी खास डावपेच आखले होते. (National Sports Games)

महाराष्ट्र संघाने सकाळच्या पहिल्या सत्रात सामन्यात चांगली सुरुवात केली. यामुळे उत्तर प्रदेश संघाचा आघाडीचा प्रयत्न वेळोवेळी अपयशी ठरला. यादरम्यान महाराष्ट्राची गोलरक्षक मानसी पाटीलची कामगिरी लक्षवेधी ठरली. तिने उत्तर प्रदेश संघाचे प्रयत्न हाणून पाडले.

“स्पर्धेतील दमदार विजयने महाराष्ट्र संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता आम्ही हीच मोहीम कायम ठेवत सोनेरी यशाचा पल्ला निश्चितपणे गाठू. यासाठी सर्वच खेळाडू सज्ज झाले आहेत,” अशा शब्दांत कर्णधार श्वेता कदमने विजयाचा आनंद व्यक्त केला. “महाराष्ट्र महिला संघाचा स्पर्धेतील दुसरा सामना आज संध्याकाळी राजस्थान संघाविरुद्ध होणार आहे. या संघाविरुद्धच्या विजयाने  महाराष्ट्र संघाला रूपांतर फेरीतील आपला प्रवेश निश्चित करण्याची मोठी संधी आहे. यासाठी महाराष्ट्र संघाला दर्जेदार कामगिरी करावी लागणार आहे. यातून निश्चितपणे महाराष्ट्र संघ उपांत्य फेरी गाठू शकेल,” असा विश्वास मुख्य प्रशिक्षक अमित पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

Back to top button