पी. व्ही. सिंधू आणि तिचे दक्षिण कोरियाचे कोच यांचे नाते आहे कसे? | पुढारी

पी. व्ही. सिंधू आणि तिचे दक्षिण कोरियाचे कोच यांचे नाते आहे कसे?

टोकियो : पुढारी ऑनलाईन

पी. व्ही. सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. त्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षावर होऊ लागला. तिने रिओ ऑलिम्पिकमध्येही रौप्य पदकाला गवसणी घातली होती.

बॅडमिंटनपटू सिंधूने रविवारी चीनच्या बिंग जिआओचा सरळ गेममध्ये पराभव करत कास्य पदकावर आपले नाव कोरले. यंदाच्या तिच्या विजयात तिचे दक्षिण कोरियन प्रशिक्षक पार्क टाये-सांग यांचाही मोठा वाटा आहे. त्यांनी दबावाच्या वेळी सिंधूला हिंदीतून दिलेला सल्ला मोलाचा ठरला.

पार्क यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की ‘ज्यावेळी पी. व्ही. सिंधू एखादा पॉईंट घेते होती त्यावेळी दबाव जास्त असतो. कारण त्या पुढच्या शॉटला किंवा रॅलीला चुका होण्याची शक्यता असते.’

पार्क यांचा हिंदीतून सल्ला

ते पुढे म्हणाले ‘अशा महत्वाच्या क्षणी मी तिला शांत राहण्यास सांगत असे.’ पार्क बोलत असतानाच सिंधूने त्यांना थांबवत त्यांना आठवण करुन दिली की ते हिंदीतून आराम से असे म्हणत. त्यानंतर प्रशिक्षक पार्क यांनीही ‘होय आराम से. मला आराम से याचा अर्थ माहीत आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली.

पार्क यांनी याआधी सिंधूच्या कांस्य पदक मिळवण्यावर समाधान व्यक्त केले होते. विशेष करुन त्यांच्या प्रशिक्षणाखाली पी. व्ही. सिंधू ही पहिली ऑलिम्पिक पदक जिंकणारी खेळाडू ठरली.

ते म्हणाले, ‘सिंधू ही मी प्रशिक्षण सुरु करण्याआधीच स्टार खेळाडू होती. मी सांगितले की मी सिंधूला सुवर्णपदक जिंकून देण्यासाठी प्रयत्न करेन. पण, कांस्यपदकही काही कमी नाही. त्यामुळे मी आनंदी आहे.’

पी. व्ही. सिंधू देखील आपले प्रशिक्षक पार्क यांचे कौतुक करत होती. तिने ‘मी पार्क यांना खूप पूर्वीपासून ओळखत होते. आम्ही ज्यावेळी एकत्र सराव सुरु केला त्यावेळी आम्हा दोघांना एकमेकांना जाणून घेण्यास थोडा वेळ लागला. पण, आमचे दोघांचे लक्ष्य ऑलिम्पिक पदक जिंकणे हेच होते.’ अशी माहिती दिली.

सेमी फायनलनंतर पार्क यांचे मोलाचे मार्गदर्शन

ती पुढे म्हणाली, ‘त्यांनी माझ्यावर जे कष्ट घेतले ते खूप ग्रेट होते.’ पी. व्ही. सिंधू आपल्या प्रशिक्षकांबद्दल सांगताना म्हणाली की, मी ज्यावेळी तौवानच्या तै तझु यिंग हिच्याकडून सेमी फायल हरले त्यानंत त्यांनी मला चांगल्या प्रकारे प्रेरित केले.

‘सुरुवातीला सेमी फायनल हरल्यानंतर मी खूप दुःखी होते. मी रडत होते. पण, प्रशिक्षकांनी अजून सर्व काही संपलेले नाही असे सांगितले. तुझ्याकडे अजून एक संधी आहे असे ते म्हणाले. त्यामुळे माझ्या मनात मिश्र भावना होती.’ असे पी व्ही. सिंधू म्हणाली.

सिंधूने प्रशिक्षक पार्क यांनी मला कास्य पदक जिंकण्यासाठी कसे प्रेरित केले हे सांगितले. ती म्हणाली, ‘प्रशिक्षक पार्क यांनी माला कास्य पदक मिळवणे आणि चौथ्या स्थानावर राहणे यातील सांगितलेला मोठा फरक अजून लक्षात आहे. तुमच्या देशासाठी तुम्ही पदक मिळवणे हा एक वेगळाच गौरवाचा क्षण असतो.’

हेही वाचला का? 

Back to top button