#TokyoOlympics : बॅडमिंटन महिला दुहेरीत इंडोनेशियानं इतिहास रचला… | पुढारी

#TokyoOlympics : बॅडमिंटन महिला दुहेरीत इंडोनेशियानं इतिहास रचला...

टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज सोमवारी बॅडमिंटन च्या महिला दुहेरीत इंडोनेशियाच्या ग्रेसिया पोली आणि अप्रियानी रहायू यांनी इतिहास रचला. पोली आणि रहायू या बिगर मांनाकित जोडीने बॅडमिंटन मधील चीनच्या चौथ्या मानांकित जोडीला हरवत सुवर्णपदकावर नाव कोरले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये इंडोनेशियाचे हे पहिले पदक आहे.

इंडोनेशियाच्या जोडीने चीनच्या चेन किंग चेन आणि जिया यीफॅन जोडीचा २१-१९, २१-१५ अशा सेटमध्ये पराभव केला.

हा सामना अतिशय रोमहर्षक झाला. मात्र, चीनचे बॅडमिंटनमधील वर्चस्व मोडीत काढत इंडोनेशियाने बाजी मारली. जेव्हा सामन्याचा मॅच पाईंट जिंकला तेव्हा इंडोनेशियाच्या पोली आणि रहायूला आनंदाअश्रू आवरणे कठीण झाले.

पोली (वय ३३) पाच वर्षांपूर्वी बॅडमिंटन खेळणे सोडून देणार होती. पण तिला तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या अप्रियानी रहायू ही पार्टनर मिळाली. आणि तिचे जीवनच बदलून गेले. पोली पुन्हा बॅडमिंटनकडे वळली. आणि या दोघांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये आता इतिहास रचला.

रहायू म्हणते की, ग्रेसिया पोली माझी रोल मॉडेल आहे. मी तिला बॅडमिंटन सोडू नकोस तू खेळत रहा, असे नेहमी सांगत आहे. यामुळेच पोलीला बॅडमिंटनमध्ये प्रोत्साहन मिळाले.

भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्‍य फेरीत धडक

दरम्यान, टोकियो ऑलिम्‍पिकमध्‍ये आज अत्‍यंत चुरशीच्‍या सामन्‍यात भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्‍यपूर्व फेरीत ऑस्‍ट्रेलियाचा पराभव केला. १-० असा सामना जिंकत ऑलिम्‍पिक स्‍पर्धेत भारतीय हॉकी महिला संघाने प्रथमच उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे.

आर्यलंडचा पराभव करीत महिला हॉकी संघाने स्‍पर्धेतील आपले आव्‍हान कायम ठेवले होते. यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्‍धचा सामना ४-३ असा सामना जिंकला होता.

हे ही वाचा :

Back to top button