पुणेरी पाटीपेक्षा भन्नाट पाटी मुंबईत लागली! नाव NO KISSING ZONE! 😯😳 | पुढारी

पुणेरी पाटीपेक्षा भन्नाट पाटी मुंबईत लागली! नाव NO KISSING ZONE! 😯😳

पुढारी ऑनलाईन डेस्क : NO KISSING ZONE : एखाद्याचा पाणउतारा करण्यासाठी किंवा कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त टोले देण्यासाठी पुणेरी पाटी काही नवीन विषय नाही. पाटीमधील भाषा पाहूनच ती पुणेरीच असे शब्द तोंडातून बाहेर पडतात.

मात्र, या पाट्यांना मागे टाकतील अशी भन्नाट पाटी आता पुण्यात नाही, तर मुंबईमध्ये लागली आहे. आतापर्यंत नो हॉर्नच्या पाट्या वाचल्या असतील. सायलेंट झोनच्या पाट्याही वाचल्या असतील. तसंच नो पार्किंगच्या सुद्धा पाट्या वाचल्या असतील. मात्र, मुंबईच्या बोरवली परिसरात लागलेल्या पाट्या काहीशा वेगळ्या आहेत.

त्या पाट्या वाचून भल्याभल्यांच्या भुवया उंचावतील. बोरवलीच्या जॉगर्स पार्कमध्ये लोक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. मात्र, हे इथं लिहलंय “NO KISSING ZONE” या जॉगर्स पार्कमध्ये अनेक कपल्स येत असतात.

त्यांचे किसिंग पाहून इथल्या आसपासच्या सोसायटीतले लोक कंटाळले आहेत. त्यामुळे कंटाळलेल्या सोसायटीवाल्यांनी रस्त्यावरच ‘नो किसिंग झोन’ असं लिहिलंय.

NO KISSING ZONEजॉगर्स पार्क परिसर बोरवलीचा हाय प्रोफाईल परिसर आहे. याच हाय प्रोफाईल जागेमध्ये एक गार्डन बनवलं आहे.

या गार्डनमध्ये रोज कपल्स येत असतात. आडोसा पाहून कुठेतरी बसत असतात.

कुठल्यातरी कोपऱ्यात उभे राहतात आणि किसिंग करतात.

यामुळे आसपास राहणाऱ्या इमारतीमधील महिला आणि वृद्ध व्यक्ती मात्र रोज हे पाहून हैराण झाले.

त्यामुळेच ‘नो किसिंग झोन’ अशी पाटीच लागल्याने किसवाल्यांचीं अडचण करून ठेवली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button