कुस्तीपटू सुशीलकुमार विरोधात दोषारोपपत्र दाखल | पुढारी

कुस्तीपटू सुशीलकुमार विरोधात दोषारोपपत्र दाखल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पैलवान सागर धनकड हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि जागतिक कीर्तीचा कुस्तीपटू सुशीलकुमार याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी सोमवारी 170 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.

छत्रसाल स्टेडियममध्ये सुशीलकुमार व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण करून सागर धनकड याची हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी १९ जणांना आरोपी बनविलेले आहे.

अधिक वाचा :

मुख्य महानगर दंडाधिकारी (सीएमएम) सतवीरसिंग लांबा यांच्या न्यायालयासमोर हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात सुशीलकुमार याला आरोपी बनविण्यात आले आहे.

या प्रकरणात आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आले असून इतर आरोपी फरार आहेत.

२३ वर्षीय राष्ट्रीय कनिष्ठ कुस्ती चॅम्पियन विजेता सागर धनकड याची ४ मे रोजीच्या रात्री हत्या करण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या मारहाणीत सागरचे मित्र सोनू आणि अमित कुमार हे गंभीर जखमी झाले होते.

अधिक वाचा :

काय आहे प्रकरण?

कुस्तीपटू सुशील कुमारने आपल्या अनेक साथीदारांसह ४ आणि ५ मे दरम्यान मध्यरात्री छत्रसाल स्टेडियमध्ये ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखड आणि त्याचा साथीदार सोनू महल या दोघांना मारहाण केली होती. या हल्ल्यात सागर धनकड याचा मृत्यू झाला.

सुशील कुमारचे उत्तर रेल्वेतून निलंबन

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटू सागर धनकड याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक विजेता सुशील कुमारला अटक झाली. या कारवाईनंतर उत्तर रेल्वेने सुशील कुमारला सेवेतून निलंबित केले.

पुढील आदेश येईपर्यंत त्याच्या निलंबनाचा आदेश अबाधित राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुशील कुमारला अनेक पदोन्नतीनंतर उत्तर रेल्वे येथे डेप्युटी चीफ कमर्शियल ऑफिसर म्हणून नियुक्त केले होते.

सागर धनकड हत्या प्रकरणात प्रथम दिल्ली सरकारने पत्र लिहून सुशीलच्या अटकेविषयी रेल्वेला कळवले होते. यानंतर रेल्वे बोर्डाने उत्तर रेल्वेला पत्र लिहिले. यानंतर सुशीलला निलंबित करण्यात आले.

अधिक वाचा :

Back to top button