रशियाचे १ हजार सैनिक ठार केल्याचा युक्रेनचा दावा | पुढारी

रशियाचे १ हजार सैनिक ठार केल्याचा युक्रेनचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनच्या काळ्या समुद्रातील एका बेटावर रशियन सैनिकांनी बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली असताना युक्रेनच्या सैन्याने रशियाचे १००० सैनिक ठार केल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या प्रतिहल्ल्यात रशियाचे एक हजारपेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याच्या वृत्ताला युक्रेनच्या संरक्षण विभागाने दुजोरा दिला आहे. यामुळे रशियाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

रशियाने आतापर्यंत युक्रेनचे १८ टँक, ७ रॉकेट यंत्रणा आणि ४१ लष्करी वाहने उद्ध्वस्त केल्याचे सांगितले जात आहे. तसेच अनेक युक्रेन सैनिकांनी शरणागती पत्करल्याचा दावा रशियाने केला आहे. तर दुसरीकडे, रशियाचे १००० सैनिक मारले असून ३० टँक, १३ विमाने, हेलिकॉप्टर पाडल्याचा प्रतिदावा युक्रेनने केला आहे.

#RussiaUkraineCrisis : रशियाकडून ‘व्हिटो पॉवर’चा वापर, भारत, यूएई, चीनची अलिप्त भूमिका

रशियाच्या हल्ल्याविरोधात आमचे सैनिक प्रतिकार करत आहेत. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे १३७ नागरिक ठार झाले आहेत. तर ३१६ जण जखमी झाले आहेत. तसेच रशियाचे ४५० इतके सैनिक ठार झाल्याची माहिती युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या आधी दिली होती.

Russia-Ukraine conflict : राजधानी कीव्हमध्ये जोरदार संघर्ष, रशियाचे हल्ले परतवल्याचा युक्रेनचा दावा

दरम्यान, युक्रेनला घेरण्यासाठी रशियन सैनिकांनी चारी बाजूने आघाडी उघडली आहे. उत्तर युक्रेनमधील चेर्निगोव्ह शहर सील करण्यात आले आहे. इव्हानकीव्हमधून रशियाचे रणगाडे कीव्ह शहरात येण्याच्या शक्यतेने या भागाला जोडणारा पूल युक्रेनी सैनिकांनी उडवून दिल्याचे सांगितले जात आहे. कीव्ह शहराला अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सायरन वाजवून नागरिकांना सतर्क केले जात आहे. कोणत्याही क्षणी मोठा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन सज्जता ठेवण्यात आली आहे. कीव्हमध्ये शस्त्रपुरवठा वाढविण्यात आला असून स्वसंरक्षणासाठी नागरिकांना शस्त्रे देण्यात आली आहेत.

हेही वाचलंत का ?

गोवा : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ; पत्नी गंभीर

माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रशियन फौजांची मुसंडी, युक्रेन शरणागती पत्करण्याची शक्यता

Back to top button