मोठी बातमी: गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; आणखी एका आमदाराची पक्षाला सोडचिट्ठी | पुढारी

मोठी बातमी: गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; आणखी एका आमदाराची पक्षाला सोडचिट्ठी

पुढारी ऑनलाईन डेस्क: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. दरम्यान राहुल गुजरातमध्ये पोहोचण्यापूर्वीच येथे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे नेते आणि आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी तब्बल ४० वर्षांनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी देखील पक्षाचा राजीनामा देत, भाजपचे कमळ हातात धरले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी हे काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवाला मोठे धक्के मानले जात आहेत. (Gujarat Congress)

गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी आज सोमवारी (दि.४) आपल्या आमदारकीचा राजीनामा गुजरात विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. या संदर्भातील व्हिडिओ ‘ANI’ या वृत्तसंस्थेने एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Gujarat Congress )

22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित न राहण्याच्या काँग्रेस हायकमांडच्या निर्णयावर आमदार अर्जुन मोधवाडिया नाराज होते. त्यांनी पक्षाविरोधात वक्तव्य केल्यापासून ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारल्याने जनभावना दुखावल्या- आ. मोधवाडिया

काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर अर्जुन मोधवाडिया म्हणतात, “जेव्हा एखाद्या पक्षाचा जनतेशी संपर्क तुटतो, तेव्हा तो जास्त काळ टिकू शकत नाही. राम मंदिर व्हावे, अशी देशातील जनतेची इच्छा होती. काँग्रेसनेही घटनात्मक निर्णयानंतर निर्णय घेतला होता की, सर्वोच्च न्यायालयाकडून आम्ही पाठिंबा देऊ. त्यानंतरही काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारण्यात आले. तेव्हा मी पक्षाच्या या निर्णयामुळे जनभावना दुखावल्या जातील आणि आपण असे राजकीय निर्णय घेऊ नयेत, असा आवाज पक्षांतर्गत  उठवला होता. परंतु त्या निर्णयात अभाव दिसून आला. मी इतरही अनेक बाबतीत पक्षाला माझा संदेश देण्याचा प्रयत्न केला, पण मला यश आले नाही. अखेर आज मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला…” असे आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा:

 

Back to top button