रेवण्णा यांचा राजकीय पासपोर्ट रद्द करा; कर्नाटक सरकारचे पंतप्रधान मोदींना पत्र | पुढारी

रेवण्णा यांचा राजकीय पासपोर्ट रद्द करा; कर्नाटक सरकारचे पंतप्रधान मोदींना पत्र

ताजेश काळे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महिलांवरील लैंगिक शोषणाचा आरोप असलेले जनता दल (सेक्युलर) पक्षाचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा राजकीय पासपोर्ट रद्द करण्यासाठी कर्नाटक सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

रेवण्णा यांनी जर्मनीत जाण्यासाठी आमच्याकडे कुठलीही परवानगी मागितली नसून आम्हीही ती दिली नसल्याचा खुलासा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी केला आहे. कर्नाटक सरकारने रेवण्णा यांचा राजकीय पासपोर्ट रद्द करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने रेवण्णा यांच्या राजकीय पासपोर्टविषयी हे स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा :

Back to top button