MCX मार्केट उघडण्यास विलंब, नेमकं काय झालं? | पुढारी

MCX मार्केट उघडण्यास विलंब, नेमकं काय झालं?

पुढारी ऑनलाईन : काही तांत्रिक बिघाडांमुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर आज मंगळवारी (दि. १३ फेब्रुवारी) व्यवहार सुरु होण्यास विलंब झाला. मंगळवारी सकाळी ९ वाजता व्यवहार सुरु झाले नाहीत. त्यानंतर सकाळी १० वाजता व्यवहार सुरु होतील असे सांगण्यात आले होते. पण त्यानंतरही विलंब होत कमोडिटी मार्केट्सवर दुपारी १ वाजता व्यवहार सुरु झाले.

MCX च्या म्हणण्यानुसार, संथ प्रक्रिया आणि बॅकएंड फाइल्समुळे व्यवहार सुरु होण्यास विलंब झाला.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) ला दुपारी १ वाजेपर्यंत कमोडिटी मार्केट उघडण्यास विलंब होईल, असे एमसीएक्सने म्हटले होते. त्यानुसार १ वाजता व्यवहार सुरु झाले. दरम्यान, आज तीनवेळा कमोडिटी मार्केट उघडण्याचे वेळापत्रक बदलण्यात आले.

Zerodha आणि Upstox ने त्यांच्या X हँडलवर कळवले होते की तांत्रिक बिघाडामुळे MCX उघडण्यास उशीर होईल. दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) कडून प्राप्त झालेल्या ताज्या अपडेटनुसार, कमोडिटी मार्केट दुपारी १ वाजता सुरु झाले. एमसीएक्सवर व्यवहार सुरु होण्यास विलंब झाल्याने ट्रेडर्सची गैरसोय झाली.

“एक्स्चेंजला आज त्याच्या कमोडिटी डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये काही तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला. एक्सचेंजच्या टीम तसेच टेक्नॉलॉजी व्हेंडरटीसीएस या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहेत”, असे MCX ने एक्सचेंजेसना सकाळी सुरुवातीला दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले होते.

हे ही वाचा :

Back to top button