stock market : विदेशी संस्थांची शेअर बाजारात १२ हजार कोटींची गुंतवणूक | पुढारी

stock market : विदेशी संस्थांची शेअर बाजारात १२ हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गेल्या नऊ दिवसांत भारतीय शेअर बाजारात 12,590 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, तर 3 हजार 75 कोटी रुपये किमतीचे शेअर विकले आहेत. ( stock market )

संबंधित बातम्या 

नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर विक्री केली, तर कर्जरोखे खरेदी करणे पसंत केले. हाच कल फेब्रुवारी महिन्यातही दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यातील नऊ तारखेपर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी 3 हजार 74 कोटी रुपयांचे शेअर विकले, तर 12,590 कोटी रुपये शेअर आणि कर्जरोख्यांमध्ये गुंतविले.

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील कल पाहिल्यास विदेशी गुंतवणूकदारांनी 28,818 हजार कोटी रुपयांचे शेअर विकले, तर 34,930 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केल्याची माहिती जियोजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक सल्लागार डॉ. व्ही. के. विजयकुमार
यांनी दिली. ( stock market )

Back to top button