Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, १९ मे २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, १९ मे २०२४

चिराग दारूवाला :


चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : आर्थिक प्राप्‍ती होईल;पण खर्चही वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा

श्रीगणेश म्‍हणतात की, आज कार्यकुशलतेने कार्य पूर्ण करू शकाल. तरुणांना मेहनतीनुसार अनुकूल परिणाम मिळतील. आर्थिक प्राप्‍ती होईल;पण खर्चही वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. इतरांच्‍या सल्‍ल्‍याने कोणताही निर्णय घेवू नका. अन्‍यथा तुमची फसवणूक होऊ शकते. जमीन खरेदी-विक्री टाळा. कुटुंबासोबत वेळ व्‍यतित केल्‍यास मन:शांती लाभेल.

वृषभ : पती-पत्नीमध्ये योग्य सामंजस्य राहील

आज घरामध्ये कोणत्याही शुभ कार्याचे नियोजन होईल. कौटुंबिक समस्या किंवा महत्त्वाच्या विषयांवरील तुमचा सल्‍ला महत्त्‍वपूर्ण ठरेल. आज होणारे बदल तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. मात्र मुलांची नकारात्मक कृती तुम्हाला त्रासदायक ठरु शकते. त्‍यांच्‍याशी मैत्रीपूर्ण वागण्याचा प्रयत्न करा. अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात राहू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. पती-पत्नीमध्ये योग्य सामंजस्य राहील. प्रकृती ठीक राहील.

मिथुन : महिलांसाठी आजचा दिवस शुभ राहील

आज राजकीय संपर्कातून नवी संधी मिळेल. महिलांसाठी आजचा दिवस शुभ राहील. भूतकाळातील नकारात्मक गोष्टींचा तुमच्या वर्तमानावर वाईट परिणाम होऊ शकतो, याची जाणीव ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे. कर्जासंबंधित व्‍यवहारात पूर्ण पारदर्शकता ठेवा. पती-पत्नी एकमेकांच्या भावनांचा आदर करतील. स्‍नायू दुखीचा त्रास होईल.

कर्क : अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे

अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. जवळच्या नातेवाईकांच्‍या समारंभात सहभागी व्‍हाल. अनुभवी लोकांच्या सहवासामुळे लाभदायक ठरेल. तुमच्या भविष्‍यातील उपक्रमांची कोणाशीही चर्चा करू नका. आळस टाळा अन्‍यथा महत्त्वाच्‍या कामांमध्‍ये चुका होवू शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनात छोट्या-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. दिनचर्येमध्‍ये झालेल्‍या बिघाडामुळे आरोग्य बिघडू शकते.

सिंह : अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे

श्रीगणेश म्‍हणतात की, आज मित्र आणि नातेवाईकांसोबत व्‍यतित केल्‍याने तुम्हाला उत्साही वाटेल. आर्थिकदृष्ट्याही काळ अनुकूल आहे. प्रवास घडू शकतो. कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीची चिंता राहील. काही महत्त्वाचे काम अपूर्ण राहण्‍याच शक्‍यता. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद कायम राहील. गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या जाणवू शकते.

कन्या : आज कामाप्रतीचे समर्पण तुम्‍हाला यश मिळवून देईल

आज कामाप्रतीचे समर्पण तुम्‍हाला यश मिळवून देईल.मित्राला मदत कराल. अफवांवर लक्ष देऊ नका. मालमत्ता किंवा वाहन कर्ज घेणार असाल तर पुनर्विचार करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. अहंकारामुळे चूक होवू शकते. मन शांत ठेवा. आर्थिक अडचण दूर झाल्यामुळे उत्पादनाला पुन्हा गती येईल. मित्राशी अचानक झालेल्‍या भेटीने आनंद मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

तूळ : आज सर्व निर्णय स्वतः घ्या. कोणाशीही संवाद साधताना सौम्यता बाळगा

श्रीगणेश म्हणतात की, धार्मिक यात्रेचे नियोजन कराल. मुलांच्‍या यशामुळे सुखावाल. तरुणांमध्‍ये भविष्यातील निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होईल. दुसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमची दिनचर्या खराब होऊ शकते. आज सर्व निर्णय स्वतः घ्या. कोणाशीही संवाद साधताना सौम्यता बाळगा. व्यवसाय क्षेत्राशी संबंधित कोणताही प्रस्ताव येईल. अतिकामाच्‍या व्‍यस्‍ततेतूनही कुटुंबासाठी वेळ काढू शकाल. रोजच्या दिनचर्येकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक : या टप्प्यावर तुम्ही जितके कष्ट कराल तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळतील

श्रीगणेश सांगतात की, परिस्थिती पूर्वीसारखीच अनुकूल असेल. या टप्प्यावर तुम्ही जितके कष्ट कराल तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. विद्यार्थी अडचणींवर मात करण्यात यशस्‍वी होतील. शंका आणि अंधश्रद्धेमुळे नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. घरातील ज्येष्ठांचा आदर करा. नकारात्मक विचार टाळा, घरातील वातावरण प्रसन्न राहील.

धनु : कोणत्याही अनैतिक कृत्यात सहभागी होवू नका

प्रतिष्ठित लोकांची भेट फायदेशीर ठरेल. ग्रहमान अनुकूल आहे. यश दृष्‍टीक्षेपात येईल. कोणत्याही अनैतिक कृत्यात सहभागी होवू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा, अशी सूचना श्रीगणेश करतात. विद्यार्थी त्यांच्या ध्येयापासून दूर जाऊ शकतात. पती-पत्नीमधील गैरसमजामुळे वाद निर्माण होऊ शकतात. रक्तदाब, मधुमेहाचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्‍यावी.

मकर : आज तुमच्यासोबत एखादी सुखद घटना घडेल

श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुमच्यासोबत एखादी सुखद घटना घडेल. घरी पाहुण्‍याचे आगमन होईल. जमिनीशी संबंधित कामातील कागदपत्रे व्यवस्थित तपासा. एखाद्या हितचिंतकाशी न्यायालयीन प्रकरणावर चर्चा करा. व्यवसायाशी संबंधित कामे व्यवस्थित पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांचा सल्ला विचारात घ्या. घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये योग्य समन्वय राखला जाईल. आरोग्य सामान्य राहील.

कुंभ : कामाच्या ठिकाणी घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील

श्रीगणेश सांगतात की, कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या चांगल्या यशासाठी घरात उत्सवाचे वातावरण असेल. राजकीय संर्पक फायदेशीर ठरेल. आर्थिक व्‍यवहार करताना काळजी घ्‍या. तुमच्यासोबत काही फसवणूक होऊ शकते. घरातील कोणतीही समस्या सोडवताना विवेकपूर्ण विचार करा. कोणताही निर्णय घेण्यात विलंब करु नका. कामाच्या ठिकाणी घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. कुटुंबातील किरकोळ समस्‍यांकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्य उत्तम राहील.

मीन : जुन्या नकारात्मक गोष्‍टींवर विचार करु नका

आजचे ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहे. लक्षणीय यश मिळवाल. मालमत्तेसंबंधी काम मार्गी लागेल. जवळच्या नातेवाईकांबरोबरील नाते दृढ होईल, असे श्रीगणेश सांगतात. जुन्या नकारात्मक गोष्‍टींवर विचार करु नका. इतरांना मदतीच्‍या नादात तुमचे महत्त्वाचे काम प्रलंबित राहू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळा. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. अतिकामामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल.

Back to top button