रसुलाबादमध्ये ७६ जनावरांना विषबाधा; युवकांच्या खबरदारीमुळे टळली जिवीतहाणी | पुढारी

रसुलाबादमध्ये ७६ जनावरांना विषबाधा; युवकांच्या खबरदारीमुळे टळली जिवीतहाणी

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : रसुलाबाद (ता.आर्वी) येथे ७६ जनावरांना ज्वारीचे कोंबाचा चारा खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी (दि.१७) गायी, म्हशी, कालवड आदी जनावरांचा कळप चरण्यासाठी गेला होता. त्यातील जवळपास ७६ जनावरांना ज्वारीचे कोंब चारा खाल्ल्याने चार्‍यातून विषबाधा झाली. दरम्यान वेळीच डॉक्टरांनी उपचार केल्याने जनावरांचे प्राण वाचले. उपचारानंतर सर्व जनावरांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या घटनेमुळे परिसराच खळबळ निर्माण झाली. गावातील जनावरे आजारी पडत असल्याची माहिती काही पशुपालकांनी रसुलाबादमधील विवेक भबुतकर यांना दिली. त्यांनी घटनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तसेच आजारी असलेल्या आणि विषबाधा झालेल्या जनावरांच्यावर त्वरित उपचार सुरू केले. त्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील अधिकार्‍यांना दिली.

विरुळ, रोहणा आणि आर्वी येथील वैद्यकीय अधिकार्‍यांची रसुलाबाद पोहचून विषबाधा झालेल्या जनावरांवर उपचार करत त्यांचा जीव वाचवला. डॉ. रामेश्वर आढावू (सहाय्यक तालुका आयुक्त, पशुसंवर्धन) यांच्या उपस्थितीत भरारी पथक वाहनासह आली होती. यामध्ये डॉ. रामेश्वर अढावू, अंधारे, केचे, कोहाल्ड यांनी जनावरांवर उपचार केले. विवेक भबुतकर, डहाके यांनी यावेळी त्यांची मदत केली. या उपचारात ५४ गायी, ९ गोर्‍हे, १३ कालवडी अशा ७६ जनावरांचा उपचार करण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button