Stock Market Closing Bell | सेन्सेक्स प्रथमच ७२,४००, निफ्टी २१,८०० पार, गुंतवणूकदार १.६९ लाख कोटींनी श्रीमंत | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स प्रथमच ७२,४००, निफ्टी २१,८०० पार, गुंतवणूकदार १.६९ लाख कोटींनी श्रीमंत

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात आज गुरुवारी सलग पाचव्या सत्रांत तेजी कायम राहिली. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आज गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांक नोंदवला. निफ्टी ५० ने प्रथमच २१,८०० चा आणि सेन्सेक्सने ७२,४०० चा टप्पा पार केला. सेन्सेक्स ३७१ अंकांच्या वाढीसह ७२,४१० वर बंद झाला. तर निफ्टी १२३ अंकांनी वाढून २१,७७८ वर स्थिरावला.

एफएमसीजी, रियल्टी, ऑईल आणि गॅस, पॉवर आणि मेटल निर्देशांक १-२ टक्क्यांनी वाढले. आयटी वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकांना आज तेजीत व्यवहार केला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.६६ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.२ टक्क्यांनी वधारला. मुख्यतः मेटल आणि पीएसयू बँका हे क्षेत्रीय पातळीवर आघाडीवर राहिले. (Stock Market Closing Bell)

दरम्यान, २८ डिसेंबर रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३६३ लाख कोटींवर पोहोचले. ते काल २७ डिसेंबर रोजी ३६१.३१ लाख कोटी होते. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना १.६९ लाख कोटींचा फायदा झाला.

संबंधित बातम्या 

सेन्सेक्सवर काय स्थिती?

सेन्सेक्स आज ७२,२६२ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७२,४३५ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर एम अँड एम, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, नेस्ले हे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले. त्याचबरोबर टाटा मोटर्स, आयटीसी, भारती एअरटेल, कोटक बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, सन फार्मा हे शेअर्सही वाढले. तर एलटी, इन्फोसिस हे शेअर्स किरकोळ घसरले.

निफ्टीवरील टॉप गेनर्स

एनएसई निफ्टी ५० निर्देशांक आज २१,७१५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो २१,७८५ पर्यंत वाढला. निफ्टीवर कोल इंडियाचा शेअर टॉप गेनर होता. हा शेअर ४ टक्क्यांहून अधिक वाढून ३८१ रुपयांवर पोहोचला. हिरोमोटोकॉर्प, एम अँड एम, एनटीपीसी, डॉ. रेड्डीज हे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले. तर अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्टस्, एलटी हे शेअर्स खाली आले. दरम्यान, बँक निफ्टी ४८,५०० च्या जवळ पोहोचला. एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांच्या शेअर्स वाढीमुळे बँक निफ्टीला सपोर्ट मिळाला. तर निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस ०.३१ टक्क्यांनी वाढून २१,५३२ वर गेला.

बाजारातील दैनंदिन उलाढाल प्रथमच १ लाख कोटी पार

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, बाजारातील वाढत्या उलाढालीमुळे कॅश मार्केट सेगमेंटने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. भारतीय बाजाराने नवीन उच्चांक गाठल्यामुळे डिसेंबरमध्ये प्रथमच सरासरी दैनंदिन उलाढाल (ADTV) १ लाख कोटी पार झाली. एनएसई (NSE) आणि बीएसई (BSE) ची एकत्रित दैनंदिन उलाढाल १.१५ लाख कोटींवर पोहोचली आहे. आतापर्यंतचा हा सर्वकालीन उच्चांक आहे, जो मागील महिन्याच्या तुलनेत ४५.८५ टक्क्यांनी जास्त आहे. उच्च मूल्यांकन असूनही गुंतवणूकदारांचा सहभाग वाढला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने या वर्षी आतापर्यंत प्रत्येकी १५ टक्के नोंदवली आहे. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप ताज्या विक्रमी उच्चांकासह प्रत्येकी ४५ टक्क्यांनी वाढले आहे. बाजारातील विश्लेषकांनी ADTV मधील वाढीचे श्रेय आयपीओ लिस्टिंग आणि एसएमई सेगमेंटला दिले आहे.

झोमॅटोला झटका

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे (Zomato Share Price) चे शेअर्स बीएसईवर (BSE) आजच्या ट्रेडमध्ये ५ टक्क्यांनी घसरून १२० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर दुपारच्या व्यवहार हे शेअर्स १२२ रुपयांवर होते. या कंपनीला वस्तू आणि सेवा कर (GST) कडून ४०२ कोटी रुपयांच्या थकित कर रकमेबद्दल कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. Zomato ला २६ डिसेंबर रोजी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ च्या कलम ७४ (१) अंतर्गत जीएसटी इंटेलिजेंस महासंचालनालयाच्या पुणे विभागीय युनिटकडून कारणे दाखवा नोटीस (SCN) प्राप्त झाली होती. (Stock Market Closing Bell)

परदेशी गुंतवणूकदार

भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूदारांचा ओघ वाढला आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) मागच्या सत्रात २,९२६.०५ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) १९२.०१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

Back to top button