Gold Rate | सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर | पुढारी

Gold Rate | सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

पुढारी ऑनलाईन : सोन्याच्या दरात वाढ सुरुच आहे. आज गुरुवारी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६३,६४४ रुपयांवर पोहोचला. सोने दराचा हा सर्वकालीन उच्चांक आहे. याआधी ४ डिसेंबर २०२३ रोजी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६३,२८१ रुपयांवर गेला होता. आज सोन्याने ६३,६०० रुपयांचा टप्पा पार केला. सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली. चांदीचा दर प्रति किलो ७४,८०० रुपयांवर खुला झाला आहे. (Gold Rate)

संबंधित बातम्या 

काल बुधवारी शुद्ध सोन्याचा दर ६३,२२३ रुपयांवर बंद झाला होता. आज तो ४२१ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ६३,६४४ रुपयांवर खुला झाला. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६३,६४४ रुपये, २२ कॅरेट ५८,२९८ रुपये, १८ कॅरेट ४७,७३३ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३७,२३२ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा व्यवहार प्रति किलो ७४,८०० रुपयांवर होत आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) ५ फेब्रुवारी २०२४ डिलिव्हरी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ०.१० टक्के वाढून ६३,७४० रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदी प्रति किलो ७५,५९१ रुपयांवर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात तेजी आहे. अमेरिकेत सोन्याचा भाव प्रति औंस २,०८५.८८ डॉलर आहे. तर चांदीचा व्यवहार प्रति औंस २४.३६ डॉलरवर होत आहे.

असे ओळखा शुद्ध सोने?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

Back to top button