Stock Market Closing Bell | दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्सने ५८० अंक गमावले, नेमकं काय झालं? | पुढारी

Stock Market Closing Bell | दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्सने ५८० अंक गमावले, नेमकं काय झालं?

पुढारी ऑनलाईन : आशियाई बाजारातून कमकुवत संकेत आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयापूर्वी आज मंगळवारी (दि.३१) भारतीय शेअर बाजारात विक्री दिसून आली. आजच्या अस्थिर सत्रात सेन्सेक्स २३७ अंकांनी घसरून ६३,८७४ वर बंद झाला. तर दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्सने आज ५८० अंक गमावले. तर निफ्टी ६१ अंकांच्या घसरणीसह १९,०७९ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

संबंधित बातम्या

आजच्या ट्रेडिंग सत्रात रियल्टी स्टॉक्स आघाडीवर राहिले. तर ऑईल, गॅस आणि एनर्जी स्टॉक्सवर दबाव दिसून आला. रियल्टी वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक ऑटो, बँक आणि हेल्थकेअर ०.३ ते ०.६ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.३ टक्क्यांनी वधारला, तर स्मॉलकॅप निर्देशांक बंद होताना सपाट झाला.

सेन्सेक्स आज ६४,४४९ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६३,८१२ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर एम अँड एम, सन फार्मा, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, रिलायन्स, आयसीआयसीआय हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांदरम्यान घसरले. ॲक्सिस बँक, इन्फोसिस, आयटीसी, टाटा स्टील, टीसीएस हे शेअर्सही घसरले. तर टायटन, कोटक बँक, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, एनटीपीसी, एलटी, नेस्ले इंडिया हे शेअर्स तेजीत राहिले.

निफ्टीवर एम अँड एम (M&M), सन फार्मा, आयशर मोटर्स, LTIMindtree आणि ओएनजीसी हे सर्वाधिक घसरले, तर एसबीआय लाइफ इन्शुरन्स, टायटन कंपनी, एचडीएफसी लाइफ, कोटक महिंद्रा बँक आणि एशियन पेंट्स हे वधारले. (Stock Market Closing Bell)

गुंतवणूकदारांची सावध भूमिका

भारतीय शेअर बाजाराने आज तेजीत सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३३९ अंकांनी वाढून ६४,४५२ वर पोहोचला होता. तर निफ्टी ५० निर्देशांक ९२ अंकांच्या वाढीसह १९,२३३ वर गेला होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांक घसरले. गुंतवणूकदारांचे आगामी फेडरल रिझर्व्हची दोन दिवसीय बैठक आणि गुरुवारी जाहीर होणाऱ्या ॲपलच्या कमाई अहवालाकडे लक्ष लागले आहे. यामुळे त्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

कच्च्या तेलाचे दर

मध्य पूर्वेतील संघर्षाच्या चिंतेमुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मागील सत्रात ३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरल्यानंतर मंगळवारी आशियातील व्यवहारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. डिसेंबर ब्रेंट क्रूड फ्यूचर्सचा दर ०.७४ टक्के वाढून प्रति बॅरल ८८.१० डॉलरवर गेला आहे.

हे ही वाचा :

Back to top button