अर्थज्ञान : भविष्य निर्वाह निधीचा पैसा काढताना कर लागतो का? | पुढारी

अर्थज्ञान : भविष्य निर्वाह निधीचा पैसा काढताना कर लागतो का?

विधिषा देशपांडे

एकाच ठिकाणी सलग पाच वर्षे नोकरी होण्यापूर्वीच पीएफ खात्यातून पैसा काढायचा असेल, तर त्यावर कर भरावा लागेल की नाही, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) ही बचत योजना असून, ती कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते. अर्थात, ईपीएफवर कधी कर आकारला जातो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. ईपीएफ काढण्यावर कर कसा लागू होतो आणि कराचे नियम काय आहेत, हे जाणून घेऊ.

ईपीएफ काढल्यावर कर

ईपीएफमधून पैसे काढण्यावर नेहमीच कर आकारला जात नाही. कर आकारणी ही कालावधीवर अवलंबून आहे.
लवकर काढल्याने कर : एकाच ठिकाणी पाच वर्षे सलग सेवा पूर्ण करण्याच्या अगोदरच ईपीएफचा पैसा काढत असाल, तर त्यावर कर भरावा लागेल.
पाच वर्षांनंतरचा कर : पाच वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर ईपीएफ काढल्यास त्यावर कोणताही कर आकारला जात नाही.
व्याजावर कर : ईपीएफच्या रकमेवर मिळणारे व्याज हे निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असेल, तर त्यावर कर आकारला जातो. अर्थात, हा बदल वेळोवेळी होत राहतो आणि त्यानुसार नवीन नियमाची अंंमलबजावणी केली जाते.

विशेष बाब

सलग सेवा : पाच वर्षांची सेवा पूर्ण करताना ती कोणत्याही अडथळ्याविना असावी. त्यानंतर पीएफमधून काढलेल्या पैशावर कर आकारला जात नाही.
पैसे काढण्याचे कारण : आरोग्य उपचार किंवा नोकरी गमावणे यासारखी कारणे असतील तर ईपीएफ काढण्यावर कर आकारला जात नाही.
स्रोतांवर कर कपात : करपात्र ईपीएफ काढल्यानंतर ईपीएफओकडून स्रोतांवर टीडीएस आकारला जातो.
योगदानाचे विवरण : स्वत:चे आणि आपल्या कंपनीच्या ईपीएफमधील योगदानावर लक्ष ठेवायला हवे कारण पैसे काढण्यावरचा कर हा योगदानाच्या स्थितीवर अवलंबून असतो.

वेगवेगळ्या ईपीएफ खात्यांचा परिणाम

ईपीएफ आणि ईपीएफचे व्याज : ईपीएफची मूळ रक्कम आणि मिळालेले व्याज हे साधारपणे कराच्या आघाडीवर वेगवेगळे मानले गेले आहे.
ऐच्छिक भविष्य निधी (व्हीपीएफ) : व्हीपीएफमध्ये योगदान हे ईपीएफप्रमाणेच करपात्र राहू शकते.
कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) : ईपीएसचा वाटा काढल्यास तो करपात्र नसतो.

कर योजना

ईपीएफ आणि कर आकारणी : कर आकारणी होणार नाही यासाठी ईपीएफ काढण्याचे नियम समजून घ्यायला हवेत. या आधारावर चांगली आर्थिक योजना तयार करण्यात मदत मिळते.
कर वाचविण्यासाठी पर्याय : कर वाचवायचा असेल, तर ईपीएफ खात्याला नवीन कंपनीत स्थानांतरित करणे हा चांगला पर्याय आहे.
व्यावसायिक सल्लागार : ईपीएफ काढण्याच्या रणनीतीला योग्य दिशा देण्यासाठी एखाद्या आर्थिक सल्लागाराची भेट घेऊन चर्चा करायला हवी.

Back to top button