वेध शेअर बाजाराचा : वाढते यूएस बाँड यील्डस् शेअर बाजाराच्या मुळावर | पुढारी

वेध शेअर बाजाराचा : वाढते यूएस बाँड यील्डस् शेअर बाजाराच्या मुळावर

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

इस्रायल-हमास युद्धाची वाढते चाललेली व्याप्ती वाढलेले यूएस बाँड यील्डस् आणि फेड रिझर्व्हकडून पुन्हा व्याजदर वाढ होण्याची आशंका या तीन बाबींना संपूर्ण आठवडाभर जगभरातील शेअर बाजारांना वेठीस धरले.

26 ऑक्टोबर रोजी 18837 पर्यंत निफ्टी घरंगळला. 19000 च्या खाली दिवसअखेरीस निफ्टीने क्लोजिंग देणे ही पुन्हा एकवार मंदीची नांदी आहे काय, असे सर्वांना वाटले. परंतु शुक्रवारच्या तेजीने उजेडाची तिरीप दिसली. ही तेजी सोमवारीसुद्धा अशीच राहणे अत्यंत आवश्यक आहे.

निफ्टी पावणे तीन टक्क्यांनी (19047.25), सेन्सेक्स अडीच टक्क्यांनी (63782.80), निफ्टी बँक सव्वा दोन टक्क्यांनी (42782) घसरले.
आठवडा-सत्र संपल्यावर शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजने आपले दुसर्‍या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. निव्वळ नफा 27 टक्क्यांनी वाढून रु. 17.394 कोटी झाला. सोमवारी बाजार तेजीत ओपन झाला तर त्याला हे एक कारण असू शकेल.

परदेशी गुंतवणूक संस्था FII जितक्या आक्रमकपणे विक्री करत आहेत, तितक्याच आक्रमकपणे देश गुंतवणूक संस्था (DII) खरेदी करत आहेत. रु. 13187 कोटी रुपयांची निव्वळ विक्री FIIS नी गत सप्ताहात केली, तर DIIS नी रु. 11553.30 कोटींची निव्वळ खरेदी केली.

JSW Energy, Poonawala FinCorp, IDBI, Canara Bank, Dr. Reddys Lab, Cipla  या सर्व कंपन्यांनी दुसर्‍या तिमाहींचे उत्कृष्ट आर्थिक निकाल सादर केले. कॅनरा बँकेचा शेअर वर्षभराच्या उच्चांकी पातळीवर आहे.

BSE Zo S&P BSE Sensex च्या ऑपरेशन डेरिव्हेटिव्हच्या ट्रेडिंगवरील ब्रोकरेज चार्चेस वाढवले. त्यामुळे हा शेअर आठवड्यात 20 टक्के वाढला. (रु. 1856.95) मागील एक वर्षात तो 200 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

महिंद्रा लॉजिस्टिक्स, टेक महिंद्रा यांनी खराब निकाल सादर केले. चार दिवसांपूर्वी Economic Times मध्ये दोन बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यातील एका बातमीनुसार FIIS नी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात Power Construction, IT या सेक्टर्समधील शेअर्सची विक्री केली.

Oil, Gas Financial Services या शेअर्समध्येसुद्धा विक्री दिसून आली, तर Telecom, Construction Materials मधील शेअर्सची खरेदी त्यांनी केली. Realty, Textiles शेअर्सनीदेखील FIIS ना आकर्षित केले.

दुसरी बातमी मनोरंजक होती. त्या बातमीनुसार Samco Securities या संस्थेने नवरात्री उत्सव प्रारंभ ते दिवाळी पाडवा मुहूर्त ट्रेडिंग या दरम्यानच्या कालावधीतील शेअर बाजाराचा गेल्या दहा वर्षांचा अभ्यास केला. त्यात असे आढळून आले की, या दहा वर्षांपैकी नऊ वर्षांमध्ये शेअर मार्केटने Positive returns मिळवून दिले आहेत.

Nifty Auto, Nifty Infra, Consumer, durable, oil & gas, Financial, Services या निर्देशांकांनी या काळात लाभ मिळवून दिला असला तरी Auto Sector ने दहापैकी वर्षात सर्वाधिक लाभ मिळवून दिला आहे. त्या खालोखाल Infra Am{U Consumer Durables  सेक्टरमधील शेअर्सनी लाभ मिळवून दिला आहे. त्याद़ृष्टीने ज्यांना बाजारात Swing Trading किंवा Momentum Trading करून नफा कमवायचा असतो, त्यांनी नोव्हेंबर महिन्यासाठी खालील शेअर्सचा अभ्यास करावा.

अ.क्र.                            कंपनी                    सध्याचा भाव
1                          मारुती सुझुकी                 रु.10535.00
2                            टाटा मोटर्स                    रु.640.95
3                      टीव्हीएस स्कूटर्स                  रु.1595.50
4                      गोदरेज प्रॉपर्टीज                  रु.1603.00
5                     ओबरॉय रिअ‍ॅल्टी                   रु.1097.00
6                           व्होल्टास                         रु.835.00
7                            हॅवेल्स                           रु.1261.00

Back to top button