Varanasi | भांडणानंतर गर्भवती पत्नी रुळावर जाऊन झोपली, वाचवण्यासाठी गेलेल्या पतीसह दोघांचा मृत्यू | पुढारी

Varanasi | भांडणानंतर गर्भवती पत्नी रुळावर जाऊन झोपली, वाचवण्यासाठी गेलेल्या पतीसह दोघांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : वाराणसीच्या सारनाथमध्ये पती आणि गर्भवती पत्नीमध्ये वाद झाला. घरातील वादानंतर संतापलेल्या पत्नीने रेल्वे रुळाच्या दिशेने धाव घेतली आणि ती रेल्वे रूळावर जाऊन झोपली. हे पाहून पती तिला वाचवण्यासाठी रूळावर गेला. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या रेल्वेने धडक दिल्याने दोघांचाही मृत्यू झाला. बुधवारी (दि.११) सारनाथच्या पंचक्रोशी रेल्वे क्रॉसिंगजवळ ही घटना घडली. गोविंद सोनकर (वय ३०) आणि खुशबू सोनकर (वय २८) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.

संबंधित बातम्या : 

सारनाथच्या पंचक्रोशी चौहान वस्ती येथे राहणारा गोविंद सोनकर हा फळांचा व्यापारी होता. त्याची पत्नी खुशबू सोनकर ही गर्भवती होती. गोविंदच्या दारू पिण्यावरून दोघांमध्ये दररोज भांडणे होत होती. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास गोविंद दारू पीत असताना त्याची पत्नी खुशबू हिने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. वादानंतर संतापलेल्या पत्नीने रेल्वे रुळाच्या दिशेने धाव घेतली आणि ती थेट रेल्वे रुळावर जाऊन झोपली. त्याचवेळी ट्रेनचा हॉर्न ऐकू आल्याने गोविंद तिला वाचवण्यासाठी गेला. गोविंदने विनंती करूनही खुशबू उठली नाही, त्याने तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला, पण खुशबू रुळावरून उठायला तयार नव्हती. रेल्वे जवळ येताच गोविंदही रेल्वे रूळावर झोपला. पतीला रुळावर पाहताच खुशबूने त्याला हटवण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान वेगवान रेल्वेने दोघांनाही चिरडले.

गोविंदने पंचायतीमध्ये मागितली होती माफी

मृत खुशबू सोनकरचा भाऊ सुनील याने सांगितले की, २०१८ मध्ये खुशबू आणि गोविंद यांचे लग्न झाले होते. त्यांना तीन मुले असून तीन मुलांपैकी मोठी मुलगी चार वर्षांची, दुसरी मुलगी तीन वर्षांची आणि मुलगा सहा महिन्यांचा आहे. लग्नानंतरच दोघांमध्ये भांडणे सुरू झाली होती. कुटुंबियांनी मध्यस्थी करून दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही दिवसांनी वाद पुन्हा वाढत गेला. काही दिवसांपूर्वी अशाच वादानंतर नातेवाईक आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत पंचायत झाली. खुशबूच्या घरच्यांनी तिला गोविंदच्या घरी राहण्यास नकार दिला. यानंतर गोविंद याने  भांडण न करण्याचे आश्वासन देत माफी मगितली होती.

हेही वाचा : 

Back to top button