नांदेड : गोदावरी नदीपात्रात क्रुझर कोसळून दोघांना जलसमाधी | पुढारी

नांदेड : गोदावरी नदीपात्रात क्रुझर कोसळून दोघांना जलसमाधी

मुदखेड; पुढारी वृत्तसेवा : क्रुझर जीपवरील नियंत्रण सुटून जीप पुलावरून गोदावरी नदीत कोसळल्याने दोघांना जलसमाधी मिळाली. लोहा तालुक्यातील येळी- महाटी पुलाजवळ शुक्रवारी (दि.१०) दुपारी ४ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. उद्धव आनंदराव खानसोळे आणि थोराजी उर्फ बबलू मारोती ढगे अशी या दुर्घनेतील मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुदखेड तालुक्यातील शिखांची वाडी येथील उद्धव खानसोळे हे आपली क्रुझर जीप घेऊन येळी येथील त्यांचा मित्र थोराजी उर्फ बबलू ढगे यांना भेटण्यासाठी आले होते. दुपारी चारनंतर दोघेही क्रुझरने (एम एच २६ बी क्यू २०६१) येळी येथून मुदखेडच्या दिशेने निघाले. यावेळी क्रुझर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने येळी गावाच्या जवळ असणाऱ्या  गोदावरी नदीपात्रात त्यांची जीप कोसळली. या दुर्घटनेत जीपसह दोघेही बुडाले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनंतर उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पवार, बीट जमादार निळकंठ श्रीमंगले, पवार यांच्यासह अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर पोलिसांसह आग्निशामक दलाच्या जवानांनी दोन्ही मृतदेह व क्रुसर जीप नदीपात्रातून  बाहेर काढली.  मुदखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button