काश्‍मीरमध्‍ये भारतीय सैन्‍यदलास मोठे यश : चकमकीत ‘तोयबा’च्‍या कमांडरचा खात्‍मा | पुढारी

काश्‍मीरमध्‍ये भारतीय सैन्‍यदलास मोठे यश : चकमकीत 'तोयबा'च्‍या कमांडरचा खात्‍मा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज ( दि.१८) झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा
खात्‍मा करण्‍यात सुरक्षा दलास यश आले. यामध्‍ये ‘लश्कर-ए-तोयबा’ कमांडर उझैर खान याचा समावेश आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये गेल्या बुधवारपासून सुरू असलेली चकमक संपली आहे.. तरीही जिल्‍ह्यात शोध मोहीम सुरूच राहणार आहे. (Anantnag encounter)

जिल्ह्यातील कोकरनागच्या गाडूळ ये थील घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात सात दिवस चाललेली चकमक आज (दि.१९) संपली. मात्र, शोधमोहीम सुरूच राहणार आहे.

अनंतनाग चकमकीच्या सातव्या दिवशी मंगळवारी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) कमांडर उझैर खान दुसर्‍या दहशतवाद्यासह ठार झाला, असे सुरक्षा दलाच्‍या सूत्रांनी सांगितले. आज चकमकीत एकूण तीन दहशतवादी ठार झाल्‍याचा संशय आहे. दोघांचे मृतदेह मिळाले असून एका दहशतवाद्यांच्‍या मृतदेहाचा शोध सुरू आहे, अशी माहती अतिरिक्‍त पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले.

‘लश्कर-ए-तोयबा’चा उझैर खान चकमकीत मारला गेला आहे. शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अनंतनाग चकमक संपली आहे, परंतु शोध मोहीम सुरूच आहे, असेही विजय कुमार म्हणाले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button