Realme करत आहे युजर्सचा वैयक्तीक डेटा एकत्र? कंपनीने दिले स्पष्टीकरण | पुढारी

Realme करत आहे युजर्सचा वैयक्तीक डेटा एकत्र? कंपनीने दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : चायनीज कंपनी मोबाईल रिअल मी (Realme) वर युजर्सचा वैयक्तिक डेटा गोळा केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कंपनी अडचणी येण्याची शक्यता वाढली आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने आरोप केला आहे की कंपनी त्यांच्या परवानगीशिवाय वापरकर्त्यांचा डेटा गोळा करत आहे, त्यानंतर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनीही यावर चिंता व्यक्त करत चौकशीचे आश्वासन दिले आहे. या सर्व घडामोडीनंतर कंपनीनेच या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असून संपूर्ण प्रकरण खुलासा करत या बाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.

ट्विटर वापरकर्त्याने त्याच्या फोनचा स्क्रीनशॉट घेतला आहे, ज्याचे नाव ‘एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिसेस’ (Enhanced Intelligent Services) असे दिसत आहे. हे फीचर Realme UI 4.0 आवृत्तीमध्ये दाखवण्यात आले आहे. असा दावा करण्यात आला आहे की याच्या मदतीने यूजर्सचा वैयक्तिक डेटा संकलित करून स्मार्टफोन निर्मात्याला पाठवला जातो. हे वैशिष्ट्य बाय-डिफॉल्ट सक्षम केले आहे आणि ‘वापरकर्ता डिव्हाइस कसे वापरतो हे समजून घेऊन त्याची कार्ये ऑप्टिमाइझ करण्याचा’ दावा करण्यात आला आहे.

ही माहिती गोळा करते कंपनी

फीचरच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की वापरकर्त्यांसाठी फंक्शन्स ऑप्टिमाइझ करण्यासाठी फोनला त्यांचा डेटा गोळा करावा लागेल. या डेटामध्ये ‘डिव्हाइस माहिती, अॅप वापर आकडेवारी, स्थान माहिती, कॅलेंडर इव्हेंट्स आणि मिस्ड कॉल्स किंवा न वाचलेल्या संदेशांशी संबंधित आकडेवारी’ समाविष्ट आहे आणि वापरकर्ता अनुभव सुधारण्यासाठी वापरल्याचा दावा केला जातो. इतकेच नाही तर एसएमएस वाचणे, कॉल लॉग पाहणे आणि कॅलेंडर इव्हेंट पाहणे याशिवाय इंटरनेटशी कनेक्ट करण्याची परवानगीही या फीचरला देण्यात आली आहे.

या क्षणी हे स्पष्ट नाही की वापरकर्त्याला या सर्व परवानग्या मॅन्युअली द्याव्या लागतील की कंपनी स्वयंचलितपणे या वैशिष्ट्यासाठी सर्व परवानग्या देत आहे. तसे असल्यास, वापरकर्त्यांना न कळवता त्यांचा डेटा गोळा करून वापरला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणावर कंपनीने दिले स्पष्टीकरण

Realme ने स्पष्ट केले आहे की वापरकर्त्यांच्या फोनद्वारे गोळा केलेल्या डेटाच्या मदतीने फोनची कार्यक्षमता सुधारली जाते आणि हा डेटा डिव्हाइसमध्येच संग्रहित केला जातो. कंपनीने म्हटले आहे की हा डेटा इतर कोणाशीही शेअर केलेला नाही किंवा तो क्लाउडवर अपलोडही केलेला नाही. 91Mobiles दिलेल्यामाहिती नुसार, Realme ने आरोप नाकारले आहेत आणि सांगितले आहे की डेटा एनक्रिप्ट केलेला आहे आणि स्थानिक पातळीवर संग्रहित आहे.

अधिक वाचा :

Back to top button