IndiGo Mega Deal : इंडिगोची ऐतिहासिक मेगा डिल; एअर बसला दिली ५०० विमानांची ऑडर्स

IndiGo Mega Deal : इंडिगोची ऐतिहासिक मेगा डिल; एअर बसला दिली ५०० विमानांची ऑडर्स

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : खासगी क्षेत्रातील विमान कंपनी इंडिगोने एअरबससोबत मोठा करार जाहीर केला आहे. इंडिगो ५०० Airbus A320 विमाने खरेदी करणार आहे. ही खरेदी अशा वेळी होत आहे जेव्हा देशातील बहुतांश विमान कंपन्या विमान उद्योगात संघर्ष करत आहेत. आर्थिक अडचणींमुळे, GoFirst एअरलाइन ऐच्छिक दिवाळखोरी प्रक्रियेतून जात आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्यांनी स्पाइसजेटच्या विरोधात दिवाळखोरीसाठी अर्जही केले आहेत. या कंपन्यांनी भाडेतत्त्वावर विमाने दिली आहेत. कोणत्याही भारतीय विमान कंपनीने दिलेली ही सर्वात मोठी एकत्रित ऑर्डर आहे. (IndiGo Mega Deal)

इंडिगो म्हणाली काय  (IndiGo Mega Deal)

इंडिगो एअरलाइनने या ऑर्डरबद्दल सांगितले की, २०३० ते २०३५ दरम्यान विमानांची डिलिव्हरी अपेक्षित आहे. "५०० विमानांची ही ऑर्डर केवळ इंडिगोची आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर नाही, तर एअरबससह कोणत्याही विमान कंपनीने केलेली एक-वेळची सर्वात मोठी खरेदी आहे," इंडिगोने म्हटले आहे. कंपनीने सांगितले की, या ५०० विमानांची इंजिने कालांतराने निवडली जातील; यामध्ये A320 आणि A321 विमानांचा समावेश असेल. या विमानांची किंमत सुमारे ५०० अब्ज डॉलर इतकी असेल, परंतु वास्तविक किंमत कमी असणे अपेक्षित आहे कारण मोठ्या ऑर्डरसाठी मोठ्या सवलती देखील उपलब्ध असतात.त्याचवेळी, एअरबसने आपल्या ट्विटर अकाऊंटवर सांगितले की, व्यावसायिक विमान कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी खरेदी आहे.

युरोपातील विस्ताराची योजना

भारताच्या देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठेत इंडिगोचा वाटा जवळपास ६० टक्के आहे. ऑर्डरवर असलेल्या ५०० विमानांपैकी 300 विमान हे A321Neo आणि उर्वरित A321 XLR विमाने असणे अपेक्षित आहे. ही विमाने आठ तासांपर्यंत उड्डाणे करु शकतात आणि युरोपमध्ये विस्तार करण्याच्या एअरलाइनच्या योजनांचा मुख्य भाग असेल.  (IndiGo Mega Deal)

एअर इंडियाने ४७० दिली होती विमानांची ऑर्डर 

यापूर्वी एअर इंडियाने फेब्रुवारी महिन्यात ४७० विमाने खरेदी करण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. त्यापैकी २५० विमाने एअरबसकडून आणि २२० विमाने बोईंगकडून खरेदी करण्यात येणार आहेत. याशिवाय दोन विमान उत्पादक कंपन्यांकडून अतिरिक्त ३७० विमाने खरेदी करण्याचाही पर्याय आहे. एअर इंडियाने १७ वर्षांहून अधिक काळात प्रथमच नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे. एअर इंडियाची मालकी टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीत सरकारकडून घेतली होती.


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news