Gir Forest : गीरमधील सिंहांच्या रक्षणासाठी १८४ पथके तैनात | पुढारी

Gir Forest : गीरमधील सिंहांच्या रक्षणासाठी १८४ पथके तैनात

अहमदाबाद; वृत्तसंस्था : बिपरजॉय चक्रीवादळापासून गुजरातमधील गीर जंगलातील सिंहांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने 184 पथके तैनात केली आहेत. किनारी भागातील 40 सिंहांवर पथकांकडून विशेष नजर ठेवली जात आहे. (Gir Forest)

सिंहांचे अस्तित्व असलेल्या परिसरात सात नद्या आणि लहान तलाव आहेत. मुसळधार पावसामुळे या नद्या आणि तलावांतून पाणी वाढते. यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, गुरुवारी उशिरा रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि सिंहांच्या रक्षणासाठी करण्यात आलेल्या उपायोजनांची माहिती घेतली.  (Gir Forest)

मुख्यमंत्री पटेल यांनी जंगलातील जनावरांना चक्रीवादळापासून वाचवण्यासाठी वन विभागाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Gir Forest)

महत्त्वाचे साहित्य सज्ज

कच्छच्या मोठ्या वाळवंटी परिसरात पाच सदस्यांची सुमारे 13 पथके तैनात केली आहेत. जंगली जनावरांच्या मदतीसाठी अतिरिक्त 6 वन्यजीव बचाव पथके तयार करण्यात आली आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी जेसीबी, ट्रॅक्टर आणि अन्य आवश्यक साहित्य तैनात केले आहे.

अधिक वाचा :

Back to top button