Intelligence Agencies Monitoring Mobile Apps : देशातील संशयास्पद १०० पेक्षा अधिक मोबाईल अ‍ॅप्सवर नजर | पुढारी

Intelligence Agencies Monitoring Mobile Apps : देशातील संशयास्पद १०० पेक्षा अधिक मोबाईल अ‍ॅप्सवर नजर

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. देशभरातील सुमारे 100 पेक्षा अधिक मोबाईल अ‍ॅप्स संशयास्पद मानून गुप्तचर यंत्रणांनी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. (Intelligence Agencies Monitoring Mobile Apps)

देशात मोबाईल गुन्हेगारीचे जाळे सुमारे 5 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. गन सिम्युलेटर, टीम फाईट, रॉयट आणि डिस्कॉर्ट अशी अनेक अ‍ॅप्स आहेत, ज्याचा वापर धर्मांतरासाठी केला जात असल्याचा संशय आहे. गेममध्ये पुढे जाण्यासाठी कुराणबाबत प्रश्न विचारले जातात. प्रश्नांचे उत्तर मिळण्याच्या प्रक्रियेत जाकिर नाईकसारख्या मुस्लिम धर्मगुरूंचे व्हिडीओ शेअर केले जातात. (Intelligence Agencies Monitoring Mobile Apps)

हे व्हिडीओ पाहिल्यानंतर तत्काळ प्रश्नाचे उत्तर मिळते. शेवटी एखाद्या व्यक्तीचा ब्रेनवॉश करण्यासाठी दुसरी व्यक्ती सातत्याने त्याच्या संपर्कात राहतो. आता या अ‍ॅप्सची नावे समोर येत आहेत. यातील अनेक अ‍ॅप्सचा वापर मानवी तस्करी करण्यासाठी केला जातो. विशेषतः मुलींना विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने जाळ्यात ओढले जाते. पैसा वसूल केल्यानंतर अनेकांना विदेशात सोडले जाते, असे गुप्तचर विभागातील अधिकार्‍याने सांगितले. (Intelligence Agencies Monitoring Mobile Apps)

दहशतवाद्यांचे अत्याधुनिक जाळे

दहशतवाद्यांकडून क्राईपव्हायझर यासारखे अ‍ॅप वापरले जाते. दहशतवादी आणि गँगस्टर यांचे जाळे अत्याधुनिक झाले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी अशी अ‍ॅप्स आढळल्यानंतर त्यावर बंदी घालण्यात आली; मात्र पुढील दिवशी ही अ‍ॅप्स नवीन नावांनी सक्रिय झाली. क्राईपव्हायझर, एनिग्मा, सेफस्विस, विक्रमी, कोनियन, एलिमेंट, जंगी, मीडिया फायर, ब्रायर, बिचॅट, नंद बॉक्स अशी अ‍ॅप्सची नावे आहेत.

अधिक वाचा :

Back to top button