Himachal Pradesh election : भाजपने जाहीर केली ६२ उमेदवारांची यादी | पुढारी

Himachal Pradesh election : भाजपने जाहीर केली ६२ उमेदवारांची यादी

पुढारी ऑनलाईन डेस्क :  हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी भाजपने (Himachal Pradesh election) 62 उमेदवारांची यादी जाहीर केली. 68 सदस्यीय हिमाचल विधानसभेसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. प्रमुख उमेदवारांपैकी विद्यमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर सेराजमधून निवडणूक लढवणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुख राम यांचा मुलगा अनिल शर्मा यांना मंडीतून उमेदवारी देण्यात आली आहे. उनामधून सतपाल सिंग सत्ती यांना तिकीट देण्यात आले आहे.

माहितीनुसार भाजपाने  हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी  62 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवडणूक समितीच्या मॅरेथॉन बैठकीनंतर 62 उमेदवारांची यादी अंतिम केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश काशी आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. या यादीत पाच महिला उमेदवारांचा समावेश आहे. काही विद्यमान आमदारांना डावलण्यात आले आहे. तर विद्यमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर सेराजमधून निवडणूक लढवणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुख राम यांचा मुलगा अनिल शर्मा यांना मंडीतून उमेदवारी देण्यात आली आहे. उनामधून सतपाल सिंग सत्ती यांना तिकीट देण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. राज्यात 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर  8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button